Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या कारणामुळे सोफिया हयात आली चर्चेत, पतीवर लावला बलात्काराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 14:34 IST

बिग बॉसमुळे नावारूपाला आलेल्या सोफिया हयातचे आणि वादाचे नाते खूपच जवळचे आहे. सोफिया हयात ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे असे ...

बिग बॉसमुळे नावारूपाला आलेल्या सोफिया हयातचे आणि वादाचे नाते खूपच जवळचे आहे. सोफिया हयात ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ती तिच्या कोणत्या ना कोणत्या विधानासाठी नेहमीच वादात असते. ती काही दिवसांपूर्वी नन बनली होती. तिने ट्विटरवरून याबाबत तिच्या फॅन्सना माहिती दिली होती. रिलेशनशिपमध्ये सहन केलेला विश्वासघात, अत्याचार आणि दहशत यामुळे तिने नन होण्याचा निर्णय घेतला होता. पण काहीच दिवसांत तिने तिचा निर्णय बदलला. त्यामुळे सोफिया नन झाली, त्या काळात ती केवळ पांढऱ्या कपड्यात वावरत असे. पण तिने नंतर शॉर्ट कपडे देखील घालायला सुरुवात केली आणि एवढेच नव्हे तर ती लग्नबंधनातदेखील अडकली. तिने व्लाड स्टॅनेस्कू या तिच्या प्रियकरासोबत गेल्या वर्षी लग्न केले. ते दोघे हनिमूनला इजिप्तला गेले होते. त्यावेळी तिने तिच्या हनिमूनचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये सोफियाचा हॉट अवतार आपल्याला पाहायला मिळाला होता. एवढेच नव्हे तर तिने तिच्या पतीसोबतचे काही इंटिमेट फोटो देखील पोस्ट केले होते. तसेच तिने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. या सगळ्यावरून सोफिया तिच्या संसारात प्रचंड खूश असल्याचे सगळ्यांना वाटत होते. पण आता तिच्या पतीमध्ये आणि तिच्यात वाद सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. सोफियाने व्लाड स्टॅनेस्कूला घराच्या बाहेर काढले असून तो अतिशय वाईट व्यक्ती असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्याने सोफियाशी लग्न करण्याआधी अनेक गोष्टी लपवल्या असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच तिने तिच्या पतीवर बलात्काराचा आरोप देखील लावला आहे. तिच्या पतीने तिचा फायदा उठवला. त्यामुळे तिने व्लाड स्टॅनेस्कूला तिच्या घरातून बाहेर काढले. एवढेच नव्हे तर ती गरोदर होती. पण काही कारणांनी तिचा गर्भपात झाली. सोफिया तिच्या आयुष्यातील अतिशय वाईट काळातून जात आहे असे तिचे म्हणणे आहे. व्लाड स्टॅनेस्कू हा इंटेरिअर डिझायनर असला तरी प्रचंड कर्जबाजारी होता. सोफियानेच लग्नाचा खर्च केला होता. त्यानंतरचा देखील सगळा खर्च तिनेच केला. तिने नेहमी प्रेमावर विश्वास ठेवला. पण व्लाड स्टॅनेस्कूने तिचा हा विश्वास चुकीचा ठरवला आणि त्यामुळेच तिने त्याला घराच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असे तिचे म्हणणे आहे. Also Read : सलमान खानच्या शिक्षेवर बॉलिवूडच्या अनेकांनी व्यक्त केले दु:ख; मात्र ‘या’ अभिनेत्रीला झालायं आनंद!!