पटौडी कुटुंबाची सून होण्यापूर्वी करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या अफेयरची सगळीकडे खूप चर्चा होती. त्या दोघांनी २००४ साली एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूरने २०१२ साली सैफ अली खानसोबत लग्न केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार शाहिद कपूर आणि करीना कपूरचे ब्रेकअप अभिनेत्री अमृता रावमुळे झाल्याचे बोलले जाते. असे सांगितले जाते की अमृता आणि शाहिदचा चित्रपट विवाहच्या दरम्यान त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर करीनासोबत असलेल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. विवाह चित्रपट २००६ साली रिलीज झाला होता. त्यावेळी करीना आणि शाहिदच्या नात्याची खूप चर्चा होत होती. कित्येक लोकांनी त्यांचे ब्रेकअप होण्यामागे करिश्मा कपूरला जबाबदार ठरविले. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की करिश्मा कपूरला शाहिद आवडत नव्हता.
२००६ साली जेव्हा जब वी मेट चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली होती तेव्हा त्यांच्यात चांगले रिलेशन होते. मात्र चित्रपटाचे शूटिंग संपता संपता दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. या चित्रपटाशी निगडीत लोकांनी सांगितले होते की सेटवर दोघांमध्ये फार कमी बातचीत व्हायची. चित्रपटाच्या शेवटच्या सीनच्या शूटवेळी दोघे वेगवेगळ्या गाडीतून सेटवर आले होते.
या चित्रपटानंतर करीना आणि सैफने एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ साली ते दोघे विवाहबद्ध झाले.