Join us

‘या’ कारणामुळे झाले स्वरा भास्करचे बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप; जाणून घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:14 IST

आता मात्र तिचे नाव बॉयफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आले आहे. त्यांचे ब्रेकअप का झाले? याचे कारण नुकतेच आम्हाला कळाले आहे. लग्नाच्या विषयावरून त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समजतेय.

 वेगवेगळया मुद्यांना तोंड फोडून सोशल मीडियावर चर्चा घडवून आणण्यात तरबेज असलेली अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. महिलाकेंद्रित मुद्दे असोत किंवा देशाच्या बाबतीत काही मुद्दे यांच्या माध्यमातून  ट्विट  करून स्वरा भास्कर कायम चर्चेत असल्याचे आपण पाहिले आहे. ती अनेकदा तिच्या काही वादग्रस्त विधानांमुळे ट्रोल झाल्याचेही पाहिले आहे. आता मात्र तिचे नाव बॉयफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आले आहे. त्यांचे ब्रेकअप का झाले? याचे कारण नुकतेच आम्हाला कळाले आहे. लग्नाच्या विषयावरून त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समजतेय.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांपासून स्वरा भास्कर आणि तिचा बॉयफ्रेंड हिमांशु शर्मा हे नात्यांत होते. स्वरा हिमांशुकडे  वारंवार ‘आपण लग्न करूयात’ या मुद्यावरून बोलत असे. पण, हिमांशुच्या डोक्यात स्वरासोबत लग्न करण्याचा विषयच नव्हता. त्यामुळेच स्वराने या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले. मग त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

हिमांशु शर्मा हे  इंडस्ट्रीत लेखक म्हणून काम करतात. त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे. रांझणा, तनु वेड्स मनु, खोसला का घोसला, शुभमंगल सावधान आणि झिरो या चित्रपटांसाठी त्याने काम केले आहे. ‘तन्नु वेड्स मन्नू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम फुलु लागले. त्यांचे ब्रेकअप झाल्यावर अजूनही ते दोघे एकमेकांसोबत टचमध्ये असल्याचे कळतेय. 

टॅग्स :स्वरा भास्कर