Join us
Daily Top 2Weekly Top 5

कटाप्पाची लाडाची लेक 'व्हेरी ब्युटीफुल', सिनेसृष्टीपासून दूर राहत असते कुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:44 IST

'बाहुबली' सिनेमातील कटप्पा या भूमिकेने सत्यराज यांना खरी ओळख मिळवून दिली.सत्यराज यांना दोन मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी.

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा ''हम भी कुछ कम नहीं'' असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे, आर्यन खान असे बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलं सध्या जोरदार चर्चेत आहेत. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात.त्यामुळे सिनेमात काम करतच प्रकाशझोतात येणे गरजेचे नसून सिनेमापासून लांब राहूनही काही स्टारकिडस वाहवा मिळवत असतात.

यात आता 'बाहुबली' सिनेमातील कटप्पाची भूमिका साकारणारे सत्यराज यांच्या मुलीनेही सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाहुबली सिनेमातील कटप्पा या भूमिकेने सत्यराज यांना खरी ओळख मिळवून दिली.सत्यराज यांना दोन मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचे नाव दिव्या आहे.

दिव्याला फिल्मी दुनियेपासून दूर राहणेच पसंत आहे. दिव्या न्यूट्रिशीयानिस्ट म्हणून काम करते. सत्यराज म्हणाले होते की त्यांनी आपल्या मुलांना कधीच चित्रपटसृष्टीत काम करण्यापासून रोखले नाही. त्यांना ज्या क्षेत्रांत आपले करिअर घडवायचे आहे ते करू शकतात माझी यासाठी काही हरकत नाही.

सोशल मीडियावर दिव्या जास्त सक्रिय नसली तरी तिचे फोटो खूप व्हायरल होत आहे. फोटोत दिसत असल्याप्रमाणे कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची दिव्या विशेष खबरदारी घेते.

या फोटोंमुळे सध्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.  तिचे फोटो पाहून कटप्पा फॅन दिव्याने देखील अभिनय क्षेत्रात यावे अशा कमेंटसदेखील करत आहेत.  

टॅग्स :बाहुबली