Join us  

या कारणामुळे जुन्या घरात राहायला गेला आमिर खान, पहिल्यांदाच समोर आले त्याच्या घराचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 2:11 PM

आमिर खान आपला लेक आणि पत्नी किरणसह निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. आमिरच्या आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल.

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. अशाच एका बड्या आणि स्टार कलाकाराच्या घराबाबत आपण जाणून घेणार आहोत.

बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानने रुपेरी पडद्यावर विविधरंगी भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यासाठी जीव ओतून अभिनय करणारा अभिनेता अशी आमिरची ओळख. एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कितीही प्रयोग करावे लागले तरी आमिरने मागे पुढे पाहिलं नाही.

केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा आमिर खान अगदी परफेक्ट आयुष्य जगतो. त्याचे आलिशान घर पाहून तुम्हाला त्याच्या आलिशान लाईफस्टाइलचा अंदाज येईलच. सोशल मीडियावर इतर सेलिब्रेटींप्रमाणे आमिर खानच्याही घराचे फोटो व्हायरल होतात. 

आमिर 2013 पासून बांद्रातील कार्टर रोड परिसरातील सी-फेसिंग असणा-या 'फ्रीडा वन' अपार्टमेंटच्या टॉप फ्लोरवर राहत होता. महिन्याला आमिर १० लाख रु. इतके भाडे देत होता. लीजवर घेतलेल्या या फ्लॅटचा करार गेल्याचवर्षी संपला आहे. त्यामुळे आमिरने त्याच्या जुन्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या घराचे इंटिरिअरही करण्यात आले.आता आमिर खान पाली हिलमधील मरीना अपार्टमेंटमध्ये राहतो.

आमिर खानची पत्नी किरण रावने तिच्या या नविन घरातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आमिर आपला लेक आणि पत्नी किरणसह निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. आमिरच्या आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल.

मुळात आमिर आणि किरण दोघांच्याही आवडी-निवडी सारख्याच आहेत. दोघांनाही निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. म्हणून घरातही तुम्हाला छोटे छोटे रोपटे लावलेले दिसतील. घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी आमिरने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.

टॅग्स :आमिर खानकिरण राव