Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपचे खरे कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 20:25 IST

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा धक्का त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला बसला आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा धक्का त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला बसला आहे. सुशांत आणि अंकिताची लव्हस्टोरी पवित्र रिश्ताच्या सेटवर सुरु झाली होती. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले होते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना देखील आवडली होती. तब्बल सहा वर्षाच्या नात्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपचे नेमकं का झालं हे समजू शकलेले नव्हते. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपचे कारण समोर आले आहे.

सुशांत आणि अंकिता एकमेकांसोबत खूप खूश होते आणि ते दोघेही लग्न करणार होते. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. त्या दोघांनीही कधीही याचे कारण समोर आणले नाही. सुशांत आणि अंकिता यांनी पवित्र रिश्ता या मालिकेनंतर झलक दिखला जा या रिएलिटी डान्स शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये त्याने अंकिताला सर्वांसमोर प्रपोज केले होते. 2016 साली ते दोघे लग्न करणार होते. मात्र याच वर्षी सुशांत आणि अंकिता विभक्त झाले.

सुशांत बॉलिवूडमध्ये काम करू लागल्यानंतर अंकिता खूपच अस्वस्थ झाली होती. ती सतत सुशांतला फोन किंवा मेसेज करून त्याची चौकशी करायची. इतर अभिनेत्रींसोबतचे जवळीक साधणारे सीन तिला अस्वस्थ करायचे. याबाबत अनेकदा सुशांतने अंकिताला समजावले की त्याच्या आयुष्यात अंकितशिवाय दुसरे कोणीही नाही. काही काळासाठी अंकिता शांत झाली. मात्र पुन्हा तिने सुशांतला क्रॉस प्रश्न करण्यास सुरूवात केली.

हळूहळू सुशांतही तिच्या या वागण्याला वैतागला आणि कालांतराने ते वेगळे झाले. मात्र सुशांत अंकिताला कधीही विसरू शकला नाही. याचा खुलासा त्याला ट्रिटमेंट देणाऱ्या डॉक्टरांनीही आताच्या तपासात केला आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे