Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! रवीना टंडनला ‘देव’ मानतो हा पठ्ठा; शरीरावर लिहिले, रवीना इज माय गॉड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 17:31 IST

चाहता असावा तर असा...

ठळक मुद्देरवीनाने शेअर केलेले हे व्हिडीओ लॉकडाऊनपूर्वीचे आहेत. तूर्तास हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांचे क्रेजी फॅन्स यांच्या कथा ऐकाव्या तेवढ्या कमी. होय, काही चाहते इतके क्रेजी असतात की आपल्या आवडत्या स्टारसाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक क्रेजी चाहता रवीना टंडनचाही आहे. होय, खुद्द रवीनाने आपल्या या चाहत्याबद्दल सांगितले आहे.रवीना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहते. आपल्या चाहत्यांसाठी ती रोज नवे व्हिडीओ, फोटो शेअर करते़ यावेळी तिने दोन खास व्हिडीओ शेअर केला आणि सगळेच थक्क झाले. होय, हे दोन्ही व्हिडीओ तिच्या फॅन्सचे आहेत. 

या व्हिडीओत रवीनाच्या फॅन्सनी तिला गराडा घातला आहे. या गर्दीतला एक चाहता सर्वात खास आहे, होय, तो रवीनाला चक्क देव मानतो, या चाहत्याने काय करावे तर आपल्या शरीरावर रवीनाचे नाव लिहून कडक उन्हात तो तिची प्रतीक्षा करतोय. रवीना इज माय गॉड, असे त्याने शरीरावर लिहिले आहे. रवीनाला भेटताच तो इतका भावूक होतो की, रवीना मॅम...रवीना मॅम... करून रडू लागतो. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला सांभाळतात आणि रवीनात नुसती स्तब्ध होऊन आपल्या या चाहत्याकडे बघत राहते.

चाहत्यांचे हे दोन्ही व्हिडीओ शेअर करताना रवीना लिहिते,‘हे आम्हाला बनवतात. हा माझा चाहता रखरखत्या उन्हात माझ्यासाठी ताटकळत उभा होता. गुलाबाचे फुल हातात घेऊन माझी प्रतीक्षा करत होता मी त्याला भेटले तेव्हा त्याला विश्वास बसेना. हे प्रेम, ही निरागसता... मी हा दिवस कायम लक्षात ठेवेन. अर्थात तेव्हा ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा शब्द ऐकवताही नव्हता. मी चाहत्यांची गर्दी, त्यांचे मला प्रेमाने भेटणे, मला शुभेच्छा देणे सगळे मिस करतेय.’

हे कॅप्शन बघता रवीनाने शेअर केलेले हे व्हिडीओ लॉकडाऊनपूर्वीचे आहेत, हे कळते, तूर्तास हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

टॅग्स :रवीना टंडन