‘श्रीवल्ली’ बनून सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या जाम चर्चेत आहे. ‘पुष्पा’ सुपरडुपर हिट झाला आणि या चित्रपटानंतर रश्मिकाचं नाव सर्वांच्याच ओठांवर आलं. या चित्रपटाने रश्मिकाला एक वेगळी ओळख दिली. या चित्रपटात तिची अल्लूबरोबरची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली. चित्रपटाची गाणीही लोकांनी डोक्यावर घेतली. श्रीवल्ली... या गाण्यानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. ‘सामी सामी’ (Saami Saami) या गाण्यांनीही लोकांना वेड लावलं. सध्या रश्मिका जिथे जाईल तिथे ‘सामी सामी’ या एकाच गाण्यावर थिरकताना दिसते.
नुकतीच रश्मिका हैदराबादच्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली आणि या कार्यक्रमातही या कार्यक्रमात रश्मिका पुन्हा एकदा ‘सामी सामी’ याच गाण्यावर थिरकताना दिसली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पण हे काय? हा व्हिडीओ पाहून लोकांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरूवात केली.
अनेकांनी रश्मिकाचा व्हिडीओ बघून त्याला ओव्हर अॅक्टिंगचं नाव दिलं. ‘बस, हिला हेच येतं,’अशी कमेंट एका युजरने केली. ‘ अरे किती दिवस हेच करणार? आम्ही कंटाळो आहोत,’ अशी कमेंट अन्य एका युजरने केली. रश्मिकाच्या या व्हिडीओत प्रेक्षकांमध्ये एक मुलगी दिसतेय. रश्मिका स्टेजवर ‘सामी सामी’ गाण्यावर थिरकतेय आणि ती तिच्याकडे मख्ख चेहऱ्याने बघत आहे. ते पाहून अनेक सोशल मीडिया युजर्सनी रश्मिकाची मजा घेतली आहे.