Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरनं खांद्यावर हात ठेवताच अचानक बाजूला सरकली रश्मिका मंदाना, स्टेजवर नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:13 IST

रश्मिका आणि शाहिद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), चॉकलेट बॉय शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) लवकरच 'कॉकटेल २' (Cocktail 2) या बहुप्रतिक्षित चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. चित्रपटातील त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि लूकचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतेच, चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान रश्मिका आणि शाहिद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'कॉकटेल २'च्या एका प्रमोशनल कार्यक्रमात क्रिती, शाहिद, रश्मिका  आणि चित्रपटाची संपूर्ण टीम स्टेजवर एकत्र उभी होती. यादरम्यान शाहिदने रश्मिकाच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण रश्मिका अचानक  बाजूला झाली. विशेष म्हणजे, रश्मिकाच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीने अभिनेत्रीच्या खांद्यावर हात ठेवला होता, पण रश्मिकाने शाहिदला तसे करू दिले नाही. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (पूर्वीचे ट्विटर) युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिले, "कदाचित रश्मिका शाहिदसोबत कम्फर्टेबल नसावी". दुसऱ्या एका युझरनं लिहलं, "रश्मिकाने शाहिदसारख्या ज्येष्ठ अभिनेत्यासोबत स्टेजवर असं वागायला नको होतं". तर एकाने अगदी मजेशीर कमेंट करत लिहिले, "कदाचित रश्मिकाने शाहिदचा 'कबीर सिंग' चित्रपट पाहिला असेल, म्हणूनच ती इतकी सावध राहिली असावी". तर काहींनी  हा केवळ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंट असावा, असाही अंदाज लावला. दरम्यान, दिग्दर्शक होमी अदजानिया दिग्दर्शित 'कॉकटेल २' हा धमाकेदार चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rashmika Mandanna avoids Shahid Kapoor: Awkward moment on stage.

Web Summary : During 'Cocktail 2' promotions, Rashmika Mandanna seemingly avoided Shahid Kapoor's touch on stage, sparking speculation. Their on-screen chemistry is praised, but the viral video raises questions. Some suggest discomfort, others a publicity stunt. Film releases June 19.
टॅग्स :रश्मिका मंदानाशाहिद कपूरक्रिती सनॉन