Leela to my Ram...Mastani to my Bajirao... Best Actress to my Best Actor
हे आहे, दीपिकासोबतच्या ब्रेकअपच्या प्रश्नावर रणवीरचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 16:46 IST
अलीकडे बॉलिवूडमध्ये केवळ आणि केवळ ब्रेकअपच्याच बातम्या येत आहे. यातही दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांच्या ब्रेकअपची बातमी सगळ्यात ...
हे आहे, दीपिकासोबतच्या ब्रेकअपच्या प्रश्नावर रणवीरचे उत्तर
अलीकडे बॉलिवूडमध्ये केवळ आणि केवळ ब्रेकअपच्याच बातम्या येत आहे. यातही दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांच्या ब्रेकअपची बातमी सगळ्यात धक्कादायक म्हणतात येईल. मात्र अद्यापही दीपिका व रणवीरच्या ब्रेकअपची बातमी अनेकांच्या गळी उतरलेली नाही. नुकत्याच एका मुलाखतीत रणवीर माझ्यासाठी खास असल्याचे दीपिका म्हणाली. आता रणवीरनेही tweet करून यावर आपली चुप्पी तोडली आहे. आयफा अवार्डमधील स्वत:चा व दीपिकाचा एक फोटो रणवीरने शेअर केला असून सोबत जे काही लिहिले आहे, त्यावरून तरी रणवीर दीपिकापासून वेगळा राहूच शकत नाही, असेच वाटतेय. ‘लीला मेरी राम के लिए, मस्तानी मेरे बाजीराव के लिए, बेस्ट अॅक्ट्रेस बेस्ट अॅक्टर के लिए..कोई शक??’ असे tweet रणवीरने केले आहे. दीपिका व रणवीरच्या ब्रेकअपच्या बातम्या पेरणाºयांना रणवीरचे हे tweet जणू एक उत्तर आहे. होय ना?