Join us

आता मजा येणार! रणवीर सिंहच्या सिनेमात ओरिजनल 'डॉन' शाहरुख खानही कॅमिओ करणार? प्रियंकाच्या एन्ट्रीचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:14 IST

फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन ३' सिनेमाचं शूट लवकरच सुरु होणार आहे.

'डॉन' हा सिनेमा शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) करिअरमधला सर्वात महत्वाचा टप्पा ठरला. 'डॉन २' मध्येही त्याने नंतर काम केलं. मात्र आता 'डॉन ३' साठी त्याने नकार दिला. त्यामुळे या सिनेमात रणवीर सिंह नवा डॉन असणार आहे. शाहरुख खान 'डॉन' नसणार यामुळे चाहत्यांचीही निराशा झाली. तर रणवीर सिंहचे चाहते त्याला डॉनच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर झाले. 'डॉन ३'(Don 3)मध्ये कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान आता शाहरुख खानचा यामध्ये ग्रँड कॅमिओ असणार अशीही माहिती समोर येत आहे.

फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन ३' सिनेमाचं शूट लवकरच सुरु होणार आहे. शूटसंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. सिनेमात रणवीर सिंह आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. यासोबत ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचीही एन्ट्री होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर फरहान अख्तर सध्या शाहरुख खानसोबतही चर्चा करत आहे. शाहरुखचा यामध्ये कॅमिओ ठेवायचा फरहानचा विचार आहे. सिनेमाची स्टोरीलाईन नक्की काय असणार हे गुलदस्त्यात आहे. तसंच यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. 

मिडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानची 'डॉन ३'मध्ये अधिकृत एन्ट्री झाली आहे. याआधी तो 'डॉन'होता त्यामुळे आता तो कोणती भूमिका साकारणार याबद्दल माहिती मिळालेली नाही. फरहान अख्तरने शाहरुख खानची भेट घेतली असून त्याला भूमिका आणि स्क्रीप्टबद्दल माहिती दिली आहे. सध्या शाहरुख 'किंग'सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. फरहानसोबत त्याचं चांगलं नातं आहे त्यामुळे शाहरुखने कॅमिओसाठी होकार दिला आहे.

तसेच, प्रियंका चोप्रासोबतही फरहान अख्तरचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे त्याने प्रियंकालाही सिनेमात कॅमिओ करण्यासाठी विचारलं आहे. प्रियंकाने होकार दिला तर अनेक वर्षांनी शाहरुख आणि प्रियंका एकाच सिनेमात दिसतील. मात्र त्यांचा एकत्रित सीन असेल की नाही हा सस्पेन्सच आहे. तसंच शाहरुख पहिल्यांदाच रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूडशाहरुख खानप्रियंका चोप्रा