Join us  

दीपिकासह रणवीरने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 7:32 PM

Ranveer Singh With Deepiak Padukon Romanic Photo : सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं.

ट्रेंडिंग कपल म्हणजेच  काही दिवसांपूर्वीच ‘दीपवीर’ने दोघांसह क्वॉलिटी टाईम स्पेंड करत असल्याचा रोमँटीक फोटो शेअर केला आहे.  रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पादुकोण एकमेकांसोबत सिनेमात एकत्र दिसले नाहीत, परंतु त्यांच्या लोकप्रियतेत तसू भरही कमी झाली नाही. अलीकडेच रणवीर सिंगने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर दीपिकासोबत एक अतिशय रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. रेशीमगाठीत अडकण्याआधी एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. त्यामुळंच की त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.

 

शूटिंगनिमित्ताने दोघांना एकमेकांना वेळ द्यायला जमत नाही. त्यामुळे निवांत वेळ मिळताच एकमेकांसह वेळ घालवताना दिसतात. दोघांचा फोटो पाहून चाहत्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स दिले आहेत. मात्र सेलिब्रेटींना देखील त्यांचा हा रोमँटीक अंदाज पाहून कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

2013 साली संजय लीला भन्साळींच्या ‘राम लीला’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान दीपवीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. 2018 साली इटलीच्या लेक कोमो येथे दीपवीरने कोकणी आणि सिंधी परंपरेनुसार लग्न केले होते. या अतिशय खासगी सोहळ्यात अतिशय जवळचे कुटुंबीय व मित्र उपस्थित होते. दोघांची ऑनस्क्रिन आमि ऑफ स्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना आवडते.

लग्नाआधी मी एक आघाडीची अभिनेत्री बनले होते. मी त्याच्यापेक्षा अधिक कमावत होते, त्याच्यापेक्षा अधिक काम करत होते. अनेकदा कामात बिझी असल्यामुळे मी घरी जाऊ शकत नव्हते. पण यामुळे आमच्या नात्यावर कोणताही निगेटीव्ह परिणाम झाला नाही. रणवीरने माझ्यासकट माझ्या कामाचा सन्मान केला. त्याची हीच गोष्ट मला सर्वाधिक भावली. आमचे नाते अनोखे आहे आणि मला आयुष्यभर या नात्यात राहायला, ते निभवायला आवडेल, असे दीपिका दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली होती.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग