Join us  

कपिल देव यांच्या वर्ल्डकप विजेत्या क्षणाला रणवीर सिंगने केले रिक्रिएट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:39 PM

'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.

'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या सिनेमाविषयी  चाहत्यांमध्ये उत्सुकता असताना निर्मात्यांनी '83 चे नवे पोस्टर सादर केले, ज्यात अभिनेता रणवीर सिंह शानदार विश्व कप ट्रॉफी उंचावतना दिसत आहेत. हा तोच क्षण आहे ज्यावेळी ८३ मध्ये भारताने विश्वकप जिंकल्यानंतर कॅप्टन कपिल देव यांनी विश्वकप उंचावला होता.   

१९८३ मध्ये, भारतीय क्रिकेट टीम ने इंग्लैंडमध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. हा तो अभूतपूर्व क्षण होता, जेव्हा जगज्जेतेपदाची वेस्ट इंडिजची मक्तेदारी मोडीत काढून भारताने विश्व चषकावर आपले नाव कोरले होते. महत्त्वाचे म्हणजे भारतीय संघाने या आधी कोणतीही प्रतिष्ठित अशी टूर्नामेंट जिंकली नव्हती. 

८३च्या या पोस्टरने निश्चितच चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून रणवीर सिंगच्या हूबेहूब लुकने चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली आहे.

कबीर खान फिल्म्स प्रोडक्शन ची '८३' रिलायंस एंटरटेनमेंट आणि फैंटम फिल्म्सची प्रस्तुती असून १० एप्रिल २०२० ला हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

टॅग्स :८३ सिनेमारणवीर सिंगकपिल देव