Join us  

DeepVeer Wedding :रिसेप्शनमध्ये गिफ्ट घेण्यासंदर्भात दीपवीरने घेतला हा मोठा निर्णय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 10:55 AM

लग्नानंतर दीपवीर मुंबई व बेंगळुरूमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. या रिसेप्शनबद्दलची खास बातमी आहे.

ठळक मुद्देबॉलिवूडचे पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची लगबग सुरू झालीय. मुंबईच्या ग्रँड हयात येथे येत्या २८ नोव्हेंबरला रणवीर-दीपिकाचे रिसेप्शन होणार आहे. त्यापूर्वी २१ नोव्हेंबरला बेंगळुरातही एक रिसेप्शन होणार आहे.

बॉलिवूडचे पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची लगबग सुरू झालीय. इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे  उद्या बुधवारी आणि परवा गुरुवारी (१४-१५ नोव्हेंबर)असा दोन दिवस हा शाही विवाह सोहळा रंगणार आहे. हा विवाह सोहळा अतिशय खासगी असणार आहे आणि त्यामुळे मोजक्या ३० लोकांच्या उपस्थितीत तो पार पडणार आहे.अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या लग्नाप्रमाणेच या लग्नातही मोबाईल बॅन करण्यात आला आहे. अर्थात याऊपरही दीपिका व रणवीरच्या प्री-वेडिंगच्या तयारीचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.  लग्नानंतर दीपवीर मुंबई व बेंगळुरूमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. या रिसेप्शनबद्दलची खास बातमी म्हणजे, या रिसेप्शन पार्टीत पाहुण्यांना गिफ्ट न आणण्याची विनंती केली गेली आहे. होय, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रिसेप्शन कार्डमध्ये पाहुण्यांनी गिफ्ट आणू नयेत, अशी ठळक विनंती करण्यात आली आहे. यापुढची आणखी एक बातमी म्हणजे, एखादा गेस्ट गिफ्ट देऊ इच्छित असेल तर तो दीपवीरच्या चॅरिटीमध्ये देणगी देऊ शकतो. होय, रणवीर व दीपिका गेल्या काही काळापासून एका संस्थेशी जुळलेले आहेत. पाहुण्यांनी आपल्याऐवजी या संस्थेला भेट स्वरूपातील देणगी द्यावी, अशी दीपवीरची इच्छा आहे.मुंबईच्या ग्रँड हयात येथे येत्या २८ नोव्हेंबरला रणवीर-दीपिकाचे रिसेप्शन होणार आहे. त्यापूर्वी २१ नोव्हेंबरला बेंगळुरातही एक रिसेप्शन होणार आहे. रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला-रामलीला चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. त्यानंतर त्या दोघांनी बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग