रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. रणवीर-दीपिका गेल्या वर्षी आईबाबा झाले. ८ सप्टेंबर रोजी दीपिकाने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. रणवीर-दीपिकाने आपल्या लाडक्या लेकीचं नाव दुआ असं ठेवलं होतं. आता दुआ एक वर्षांची झाली आहे.
रणवीर-दीपिकाच्या लेकीचा नुकताच पहिला वाढदिवस साजरा झाला. लेकीच्या वाढदिवसासाठी दीपिकाने स्वत:च्या हाताने खास चॉकलेट केक बनवला होता. याचा फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "माझी प्रेमाची भाषा... माझ्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसासाठी केक बनवणे", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, रणवीर आणि दीपिकाने २०१८मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा झाले. गेल्यावर्षी रणवीर-दीपिकाच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं. लेकीची झलकही त्यांनी सोशल मीडियावर दाखवली होती.