Join us

​‘पद्मावती’तून रणवीर आउट, ह्रतिकला संधी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 14:02 IST

बहुचर्चित संजय लीला भन्साळीच्या महत्त्वाकांक्षी ‘पद्मावती’ चित्रपटासाठी अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगचे नाव जवळपास निश्चित असतानाच आता ह्रतिकचे नाव ...

बहुचर्चित संजय लीला भन्साळीच्या महत्त्वाकांक्षी ‘पद्मावती’ चित्रपटासाठी अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगचे नाव जवळपास निश्चित असतानाच आता ह्रतिकचे नाव समोर आले आहे. भन्साळींनी हृतिकसमोर सिनेमाच्या स्क्रीप्टचं वाचन करुन खिल्जीचा रोल आॅफर केल्याचं वृत्त एका वृत्तपत्राने दिलं आहे. रणवीरने भन्साळींकडे पक्की स्क्रीप्ट मागितल्यामुळेच त्याला डच्चू मिळाल्याची चर्चा आहे. हृतिकपूर्वी संजय यांनी शाहरुखकडेही या भूमिकेसाठी विचारणा केली होती, मात्र किंग खान त्याचे २०० दिवस शूटिंगसाठी देऊ शकत नसल्यामुळे हा प्रस्ताव हृतिकसमोर ठेवण्यात आला आहे.दीपिका पदुकोण या चित्रपटात मेवाडची राणी पद्मावतीच्या मुख्य भूमिकेत आहे, रणवीरला ही भूमिका मिळाली असती तर गोलियोंकी रासलीला- रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा आॅनस्क्रीन एकत्र दिसली असती.राणी पद्मावतीचे पती म्हणजे राजा रावल रतन सिंगच्या व्यक्तिरेखेसाठी शोधाशोध सुरु आहे. दीपिका तिच्या पतीच्या भूमिकेसाठी मोठ्या कलाकारासाठी आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे. काही टीव्ही अभिनेत्यांशी राजाच्या भूमिकेसाठी चर्चा सुरु होती, मात्र दीपिकाने छोट्या कलाकारांना कास्ट करण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तर राणी आणि खिल्जी यांच्यात एकही रोमँटिक सीन नाही.