Join us

​ रणवीर मिस करतोयं, पहिले प्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 17:48 IST

दीपिक पदुकोण हिचे रणवीर सिंहच्या मनात एक विशेष स्थान आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. पण रणवीर सध्या त्याच्या ...

दीपिक पदुकोण हिचे रणवीर सिंहच्या मनात एक विशेष स्थान आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. पण रणवीर सध्या त्याच्या पहिल्या प्रेमाला जाम मिस करतोय..दचकलात ना? होय...रणवीरचे पहिले प्रेम दीपिका नाही तर आणखी काही आहे. ते म्हणजे ‘न्युटेला’..होय, चॉकलेटी स्प्रेड ‘न्युटेला’ म्हणजे रणवीरचा जीव की प्राण. पण सध्या रणवीरचा ट्रेनर लॉएड स्टीवन याने रणवीरला कडक डाएटवर ठेवले आहे.‘बेफिके्रे’साठी रणवीर सध्या नो शूगर, नो अल्कोहोल आणि नो न्यूटेला...अशा कडक डाएटवर तो आहे. रणवीरच्या या डाएटवर लॉएड अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतोय. त्यामुळेच जीव की प्राण असलेल्या ‘न्युटेला’च्या आठवणीने रणवीर व्याकूळ झाला आहे. रणवीरचा पर्सनल शेफ त्याच्यासाठी जेवण बनवतो. त्याशिवाय लॉएडच्या परवानगीशिवाय काहीही खाण्यास रणवीरला बंदी घातली गेली आहे..सो सॅड रणवीर...