Join us  

रणवीर-दीपिका ह्या दिवशी अडकणार विवाहबंधनात, ह्या ठिकाणी होणार विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 12:53 PM

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पदुकोण या कपलने इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डी नावाचे ठिकाण सिलेक्ट केले आहे.

ठळक मुद्देरणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांचे लग्न होणार दाक्षिणात्य पद्धतीनेसू्त्रांच्या माहितीनुसार, रणवीर सिंग व दीपिका पदुकोण 10 नोव्हेंबरला अडकणार लग्नबेडीत

बॉलिवूडमधील बाजीराव मस्तानी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या लग्नाबाबतच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून चांगल्याच रंगल्या आहेत. आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फिल्मफेअर मॅगझिनच्या रिपोर्टनुसार दोघांचे लग्न याचवर्षी 10 नोव्हेंबरला इटलीमध्ये होऊ शकते. लग्नासाठी या कपलने इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डी नावाचे ठिकाण सिलेक्ट केले आहे. बीच हॉलिडेसाठी याला बेस्ट डेस्टिनेशन म्हटले जाते. लेक कोमो हे इटली येथील तिसरा सर्वात मोठा तलाव आहे. हा तलाव 1300 फूट खोल आणि 146 स्क्वेअर किलोमीटर लांब आहे.

रिपोर्टनुसार, दोघांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे. पहिले दोघांच्या लग्नाची तारीख 19 नोब्हेंबर ठरवण्यात आली होती. परंतू दोघांना ही तारीख योग्य वाटली नाही. यानंतर 10 नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली. कारण रणवीरला सिंबा चित्रपट लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे असे वृत्त होते. तर दीपिका सध्या कोणताही नवा प्रोजक्ट हातात घेत नाही आहे. दीपिका आणि रणवीर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी कधीच पब्लिकली आपले रिलेशन स्वीकारले नाही. परंतू सोशल मीडियावरील त्यांचे पोस्ट पाहून ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते. आता तर रणवीर दीपिकाच्या इंस्टाग्राम फोटोवर ओपनली कमेंट करत असतो. 9 जुलैला दीपिकाने आपल्या केसांवर गुलाब लावून फोटो शेअर केला होता. यावर रणवीरने कमेंट करण्याऐवजी 5 किस इमोजी पाठवल्या होत्या. यासोबतच दीपिका आपल्या मॅडम तुसाद म्यूझियममध्ये लावण्यात येणाऱ्या वॅक्स स्टॅच्यूचा डोळा पाहत होती, तेव्हा त्याने नाइस आयबॉल अशी कमेंट केली होती.आता रणवीर-दीपिका अधिकृतपणे लग्नांची तारीख कधी सांगतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण