Join us

​अखेर कॅटने सोडले रणबीरचे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 13:57 IST

एकेकाळचे लव्हबर्डस् आणि बॉलीवूडमधील आदर्श कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर-कॅट वेगळे झाल्याची बातमी अनेक चाहत्यांसाठी वेदनादायक ठरली. लग्नाच्या उंबरठ्यापर्यंत ...

एकेकाळचे लव्हबर्डस् आणि बॉलीवूडमधील आदर्श कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर-कॅट वेगळे झाल्याची बातमी अनेक चाहत्यांसाठी वेदनादायक ठरली. लग्नाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहचलेल्या त्यांच्या नात्यामध्ये ‘का रे दुरावा’ म्हणण्याची वेळ का आली हे अजुनही ठामपणे त्या दोघांशिवाय कोणाला माहीत नाही. दोघे सोबत राहत असलेल्या कार्टर रोडवरील फ्लॅटमधून रणबीर केव्हाच निघून गेला होता. आणि आता कॅटनेदेखील आता हे घर सोडले आहे. सुमारे दोन वर्षे हे घर दोघांच्या प्रेमाचे साक्षीदार ठरले. ब्रेकअप नंतर रणबीर लगेच आपल्या पालकांच्या ‘कृष्ण राज’ बंगल्यात शिफ्ट झाला होता; परंतु कॅट अद्यापही त्याच घरात राहत होती. अखरे तिनेदेखील हे आलिशान पेंटहाऊस सोडले. तिकडे रणबीरने दोन महिन्यांपूर्वी दुसरे घर खरेदी केली असून आॅक्टोबरमध्ये तो तेथे शिफ्ट होणार असल्याची माहिती आहे. गौरी खानने त्यांच्या नव्या घराचे इंटेरिअर डिझाईन केले आहे.