Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर-श्रद्धाची जादू दुसऱ्या दिवशी ओसरली, 'तू झुठी मै मक्कार' च्या कमाईत घसरण; वीकएंडकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 08:59 IST

बॉलिवूडमध्ये बऱ्याच कालावधीनंतर रोमॅंटिक कॉमेडी बघायला मिळत आहे.

Tu Jhoothi Mai Makkar : बॉलिवूडमध्ये बऱ्याच कालावधीनंतर रोमॅंटिक कॉमेडी बघायला मिळत आहे. लव्ह रंजन यांच्या 'तू झुठी मै मक्कार' सिनेमातून रणबीर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तरुणाईला आवडेल अशी प्रेमावर आधारित ही गोष्ट आहे. त्यामुळे सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसादही मिळतोय. ८ मार्च रोजी रिलीज झालेल्या फिल्मने दोनच दिवसात बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. सध्या सिनेगृहात चित्रपट हाऊसफुल सुरु आहे. मात्र  दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत काहीशी घसरण बघायला मिळाली.

रणबीर श्रद्धाच्या 'तू झुठी मै मक्कार' सिनेमाचा प्रतिसाद बघता कलेक्शनचा आकडाही जबरदस्त आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने भारतात 15.73 कोटींचा गल्ला जमवला. तर काल दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 9 कोटींचा बिझनेस केला. आता येणाऱ्या वीकएंडला गर्दी वाढण्याची शक्यता आहे.सिनेमाचे एकूण कलेक्शन 24.73 कोटी झाले आहे. 

जिथे कार्तिक आर्यनचा शहजादा आणि अक्षय कुमारचा सेल्फी दणकून आपटला, तिथे रणबीर श्रद्धाच्या जोडीने मात्र कमालच केली. आता सर्वांचं लक्ष वीकएंडकडे आहे. शनिवारी आणि रविवारी सिनेमा आणखी चांगली कमाई करेल अशी आशा आहे.

'तू झुठी मै मक्कार' सिनेमा रणबीर कपूर, श्रद्धा कपूर सोबतच बोनी कपूर यांनी देखील अभिनयात पदार्पण केले आहे. तर डिंपल कपाडियाही मुख्य भूमिकेत आहे.सिनेमा लव्ह रंजन यांनी दिग्दर्शित केला आहे. याआधी त्यांनी 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' या रोमॅंटिक कॉमेडी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :रणबीर कपूरश्रद्धा कपूरबॉलिवूड