'रामायण' या सिनेमाविषयी सिनेरसिकांमध्ये विशेष उत्सुकता आहे. हा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा सिनेमा असल्याचे बोलले जातेय. या चित्रपटाविषयी निर्माते आणि कलाकारांनी सुरुवातीपासून मौन बाळगले होते. आता सिनेमाविषयी अपडेट समोर आले आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर कधी प्रदर्शित होणार, याबद्दल अपडेट समोर आलं आहे.
'रामायण'चा ट्रेलर अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित 'सॅन डिएगो कॉमिक-कॉन' फेस्टिव्हलमध्ये रिलीज केला जाणार आहे. हा फेस्टिव्हल २३ ते २६ जुलै दरम्यान पार पडणार असून याच दरम्यान रामायणाची पहिली झलक जगासमोर येईल, असं बोललं जात आहे. सहसा मार्व्हल (Marvel) आणि डीसी (DC)सारख्या मोठ्या हॉलिवूड फ्रँचायझींचे ट्रेलर येथे लॉन्च होतात, त्यामुळे भारतीय चित्रपटासाठी ही खूप मोठी उपलब्धी मानली जात आहे.
नुकतंच अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये निवडक प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रीनिंगमध्ये 'रामायण' चित्रपटातील काही भाग दाखवण्यात आले, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विशेषतः चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), भव्य सेट आणि सिनेमॅटोग्राफी पाहून परदेशी प्रेक्षकही थक्क झाले. या सकारात्मक प्रतिसादामुळे निर्माते नमित मल्होत्रा आणि संपूर्ण टीमचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.
यंदाची दिवाळी होणार 'राममय''रामायण' हा चित्रपट यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात धडकणार आहे. यात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय पौराणिक कथेला जागतिक स्तरावरील सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
Web Summary : Ranbir Kapoor's 'Ramayana' trailer will debut at San Diego Comic-Con. Select audiences in Los Angeles have already previewed the film, praising its VFX. The movie, starring Ranbir, Sai Pallavi, and Yash, is slated for a Diwali release, promising a global cinematic experience.
Web Summary : रणबीर कपूर की 'रामायण' का ट्रेलर सैन डिएगो कॉमिक-कॉन में रिलीज होगा। लॉस एंजेलिस में चुनिंदा दर्शकों ने फिल्म देखी, वीएफएक्स की प्रशंसा की। रणबीर, साई पल्लवी और यश अभिनीत यह फिल्म दिवाली पर रिलीज होगी, जो एक वैश्विक सिनेमाई अनुभव का वादा करती है।