रणबीर कपूरच्या आगामी 'रामायण' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाचं बजेट, स्टारकास्ट, व्हीएफएक्स, हॉलिवूड टीम अशा अनेक गोष्टींमुळे सिनेमा चर्चेत आहे. दोन भागांमध्ये 'रामायण' प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. नुकतंच न्यूयॉर्कमध्ये सिनेमाची पहिली झलक दाखवली गेली. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती. रणबीर कपूरने माध्यमांशी संवाद साधताना मोठा खुलासा केला. त्याने सुरुवातीला सिनेमाला नकार दिल्याचं तो म्हणाला.
न्यूयॉर्कमधील इव्हेंटचे काही व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. यावेळी रणबीर कपूर म्हणाला, "मी आधी रामानंद सागर यांचं 'रामायण' पाहिलं. ही मालिका सर्वांच्याच जवळची आहे. प्रभू श्रीरामाचा प्रवास आणि संपूर्ण रामायण कथा यावर आपल्या सर्वांनाच गर्व आहे. मला पहिल्यांदा या भूमिकेसाठी ऑफर आली तेव्हा साहजिकच यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार याचा अंदाज होता. फक्त शारिरीक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक तयारीही तितकीच गरजेची होती. सगळं समजून घ्यावं लागणार होतं आणि कायम खरं राहायचं होतं. मी सुरुवातीला या भूमिकेला नकार दिला होता. मला आठवतंय ४ वर्षांपूर्वी जेव्हा निर्माते नमित मल्होत्रा माझ्याकडे ऑफर घेऊन आले होते तेव्हा मी लगेच नकार दिला होता. मी यासाठी फिट नाही आणि या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही असं मी सांगितलं."
तो पुढे म्हणाला, "मात्र लेकीच्या जन्मानंतर माझ्यात खूप बदल झाला. सिनेमा ऑफर झाला तेव्हाच राहाचा जन्माचा झाला. लेकीकडे पाहून माझ्या भीतीचं कृतज्ञतेत रुपांतर झालं. असं वाटलं की हे माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. माझ्या आयुष्यातला तो असा टप्पा होता जेव्हा मला माझी जीवनशैली बदलावी लागणार होती. मी पहिल्यांदा बाप झालो होतो. मला वाटतं हा सुंदर योगायोग होता जेव्हा लेकीच्या जन्मानंतर मला प्रभू श्रीरामाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझं आयुष्यच बदललं."
'रामायण'ची पहिली झलक २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर भारतात पाहायला मिळणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच आतुरता आहे. सिनेमात रणबीर आणि साई पल्लवीसोबतच यश, सनी देओल, रवी दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता असे अनेक कलाकार आहेत.
Web Summary : Ranbir Kapoor initially declined the role of Lord Rama in the upcoming 'Ramayana' film, citing the immense responsibility. However, after the birth of his daughter, Raha, he reconsidered, feeling a profound shift and a readiness to embrace the challenge. The film's first look debuts April 2nd.
Web Summary : रणबीर कपूर ने आगामी 'रामायण' फिल्म में भगवान राम की भूमिका को पहले ठुकरा दिया था, उन्होंने बड़ी जिम्मेदारी का हवाला दिया। हालांकि, अपनी बेटी राहा के जन्म के बाद, उन्होंने पुनर्विचार किया, एक गहरा बदलाव महसूस किया और चुनौती को अपनाने के लिए तैयार हो गए। फिल्म की पहली झलक 2 अप्रैल को जारी होगी।