Join us  

पापाराझींच्या गर्दीत घाबरलेल्या वहिदा रहमान यांच्या मदतीला धावून आला रणबीर, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 9:52 AM

आलिया-रणबीरच्या पुढील सीटवर वहिदा रहमान बसल्या होत्या.

काल ६९ वा राष्ट्रीय फिल्म पुरस्काराचे (69th National Film Awards) दिल्लीत आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय सिनेमातील अनेक कलाकार या पुरस्काराचे मानकरी ठरले. क्रिती सेनन, आलिया भट, पंकज त्रिपाठी, अल्लु अर्जुन या कलाकारांनी पुरस्कार पटकवला. तर ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Wahida Rahman) यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. यावेळी वहिदा रहमान यांच्यासमोर माध्यमांची गर्दी झालेली दिसली. तेव्हा आलियाच्या बाजूला बसलेला रणबीर कपूर (Ranbir Kapoor)वहिदाजींसाठी धावून आला. 

अभिनेता रणबीर कपूर पत्नी आलियासोबत तिच्या या खास दिवशी उपस्थित होता. त्याने आलियाला पुरस्कार घेताना पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता. तर आलिया-रणबीरच्या पुढील सीटवर वहिदा रहमान बसल्या होत्या. अचानक वहिदाजींच्या टेबलजवळच माध्यमांची गर्दी झाली. अशातच गर्दी वाढल्याने वहिदा घाबरल्या. त्यांना काही होऊ नये म्हणून रणबीर लगेच जागेवरुन उठला आणि त्याने माध्यमांना जरा सांभाळून असा त्याने सल्ला दिला.

रणबीर कपूर नेहमी ज्येष्ठांचा आदर करताना दिसतो. आणखी एका व्हिडिओत तो एका महिलेला पायऱ्यांवरुन खाली उतरताना मदत करत होता. रणबीरच्या याच कृतीचं पुन्हा एकदा कौतुक होत आहे. या पुरस्कार सोहळ्यात आलिया भटने तिच्या लग्नातलीच साडी नेसली होती. यामुळे सर्वांचंच लक्ष त्याकडे गेलं. तर रणबीर कपूर ब्लॅक सूटमध्ये खूप हँडसम दिसत होता. सर्वांच्या नजरा या दोघांवर खिळल्या होत्या.

टॅग्स :रणबीर कपूरवहिदा रहमानराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार