Join us

रणबीर-अयान गेले मुव्ही डेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 11:53 IST

रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी याची दोस्ती-यारी तर सगळ्यांनाच माहीत आहे. रणबीरने अयानच्या दिग्दर्शनाखाली ‘वेक अप सिड!’ आणि ...

रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी याची दोस्ती-यारी तर सगळ्यांनाच माहीत आहे. रणबीरने अयानच्या दिग्दर्शनाखाली ‘वेक अप सिड!’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ हे दोन चित्रपट केले आहेत. त्याने अनेक वेळा मान्य केले आहे की, अयान त्याचा सर्वात जवळचा मित्र आहे. ‘इंडिपेंडन्स विकेंड’ला जसे आपण सर्वांनी मित्रांसोबत धमाल केली तशीच रणबीरनेदेखील अयानसोबत मुंबईतील एका थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. इंटरव्हलमध्ये दोघांनी कॉफीचा आनंद घेत चित्रटाविषयी चर्चादेखील केल्याचे तेथे उपस्थित फॅन्सनी सांगितले. आता खुद्द रणबीरच थिएटरमध्ये आहे हे कळाल्यावर मग चाहत्यांना त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्यानेसुद्धा चाहत्यांची निराशा केला नाही. सोशल मीडियावर हे फोटोज् चांगलेच व्हायरल झाले.