Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतने घेतले रामेश्वरमचे दर्शन; फोटो व्हायरल!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 17:03 IST

बॉलिवूडच्या विविध मुद्यांवर तिने परखडपणे तिची मते मांडली आहेत. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आलीय; तिने अलीकडेच रामेश्वरम मंदिराचे दर्शन घेतले आहे.

बॉलिवूडची बोल्ड ‘क्वीन’ कंगना राणौत ही कायम तिच्या अटींवर आयुष्य जगते. एखादा प्रोजेक्ट स्विकारताना ती तिच्या मनाला तो विषय भावला तरच ती प्रोजेक्ट स्विकारते. बॉलिवूडच्या विविध मुद्यांवर तिने परखडपणे तिची मते मांडली आहेत. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आलीय; तिने अलीकडेच रामेश्वरम मंदिराचे दर्शन घेतले आहे. येथील तिच्या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघायला मिळत आहेत. तिच्यासोबत तिची बहीण रंगोली चंडेल ही देखील होती. 

अलीकडेच महाशिवरात्रीनिमित्त अनेक सेलिब्रिटींनी धार्मिक वातावरणात एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच अनेकांनी त्यांचे बिग प्रोजेक्टची यादिवशी घोषणा केली. तर कंगना राणौतने मात्र या पवित्र दिवशी रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेतले. कंगना ही खूपच अध्यात्मिक वातावरणात मोठी झालेली असल्याने ती खुपच धार्मिक आहे. व्हायरल झालेल्या फोटोत ती अत्यंत मनोभावे दर्शन घेत असल्याचे दिसून येत आहे. 

रामेश्वरम मंदिराची आख्यायिकेनुसार, रावणाला मारल्याच्या पापातुन मुक्त होण्यासाठी रामाने येथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केली, असे मानले जाते. रामेश्वरम हे ज्योतिर्लिंग भारताच्या चार धामांपैकी एक मानले जाते. कंगना एक मोठी शिवभक्त आहे. तसेच तिने माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या मेमोरिअलला ही तिने भेट दिली.     

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडथलायवी