नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या भव्य चित्रपटाची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात 'रावणा'ची भूमिका साकारणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) याने चित्रपटाच्या कथानकाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे 'रामायण' पाहायला जाणाऱ्या चाहत्यांची चांगलीच निराशा होणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
पहिल्या भागात युद्धाचा अभाव? फैंडैंगो मीडियाला दिलेल्या मुलाखतीत यशने खुलासा केला आहे की चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रभू श्रीराम आणि रावण हे एकदाही आमनेसामने येणार नाहीत. चित्रपट निर्मात्यांनी महाकाव्याची मांडणी अशा प्रकारे केली आहे की, पहिल्या भागात केवळ पात्रांची ओळख, श्रीरामाचा वनवास आणि सीताहरण इथपर्यंतचा प्रवास दाखवला जाण्याची शक्यता आहे. यश म्हणाला, "रामायण ही एक मोठी कथा आहे आणि ती घाईत सांगून चालणार नाही. पहिल्या भागात राम आणि रावण यांची समोरासमोर भेट होणार नाही. ते एकमेकांसमोर येणार नाहीत."
हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित केला जाणार आहे. पहिल्या भागात प्रभू श्रीरामाचे बालपण, विवाह आणि वनवासावर लक्ष केंद्रित केले जाईल, तर दुसऱ्या भागात रावण आणि राम यांच्यातील संघर्षाला सुरुवात होईल. यशने केलेल्या या विधानामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तर काही चाहत्यांची निराशा झाली आहे. कारण रावण पडद्यावर एकमेकांसमोर कधी आणि कसे दिसणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
दिग्गज स्टारकास्ट
या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यशने या चित्रपटासाठी केवळ अभिनयच केला नाही, तर तो या चित्रपटाचा सह-निर्माता देखील आहे. चित्रपटाचे व्हीएफएक्स (VFX) आणि भव्यता जागतिक दर्जाची असणार असल्याचे बोलले जात आहे. यश चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. येत्या दिवाळीत 'रामायण'चा पहिला भाग बघायला मिळेल.
Web Summary : In Nitesh Tiwari's 'Ramayana' part one, Ram and Ravan won't meet. The film focuses on character introductions, Ram's exile, and Sita's abduction. Part two will showcase the Ram-Ravan conflict. Ranbir Kapoor stars as Ram, and Sai Pallavi as Sita. Releasing this Diwali.
Web Summary : नितेश तिवारी की 'रामायण' के पहले भाग में राम और रावण का मिलन नहीं होगा। फिल्म में किरदारों का परिचय, राम का वनवास और सीता हरण दिखाया जाएगा। दूसरा भाग राम-रावण के संघर्ष पर केंद्रित होगा। रणबीर कपूर राम और साई पल्लवी सीता की भूमिका में हैं। यह फिल्म दिवाली पर रिलीज होगी।