Join us

'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:07 IST

'या' दिवशी बघायला मिळणार 'रामायण'ची पहिली झलक

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) सिनेमाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आतापर्यंत सिनेमाचं फक्त टायटल आणि रिलीजचं वर्ष समोर आलं. त्यानंतर मेकर्सने कोणतीही घोषणा केली नाही. सिनेमातील स्टारकास्टबाबतही त्यांनी अधिकृत सांगितलेले नाही. तरी रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल, यश लारा दत्ता, रवी दुबे सह आणखी कोण कोण स्टार असणार हे सगळ्यांना माहितच आहे. तर आता 'रामायण'ची पहिली झलक कधी येणार हे समोर आले आहे. 'या' दिवशी प्रेक्षकांना पहिली झलक पाहायला मिळणार आहे.

'रामायण'च्या सेटवरुन रणबीर, साई पल्लवी, लारा दत्ता आणि यशचे फोटो व्हायरल झाले आहेत. टीव्ही अभिनेता रवी दुबे सिनेमात लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. सिनेमाच्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं असून सेटवरुन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नितेश तिवारी स्पीच देत आहेत. त्यानंतर रणबीर आणि रवी दुबे एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. शूट पूर्ण झाल्यानिमित्त सेटवर केकही कट केला आहे. सिनेमाच्या सेटवरचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

'या' दिवशी पाहायला मिळणार सिनेमाची झलक

'पिंकव्हिला'रिपोर्टनुसार, 'रामायण'चे मेकर्स ३ जुलै रोजी लोगो लाँच करणार आहेत. ही फक्त सिनेमाची घोषणा आणि रिलीज डेटसंदर्भातली माहिती असणार आहे. तसंच सिनेमाचा टीझर हा ३ मिनिटांचा असणार आहे. टीझर तयार आहे मात्र ३ जून लाच तो रिलीज केला जाईल की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सिनेमाच्या रिलीजला अजूनही दीड वर्ष आहे. 

'रामायण' सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीराम आणि साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. लारा दत्ता कैकयी, रकुल प्रीत शूर्पणखा, यश रावण, सनी देओल हनुमान, अरुण गोविल दशरथ, रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमाचा पहिला भाग रिलीज होणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूररामायणरवि दुबेबॉलिवूड