}}}} ">http://}}}} ">Trying to tame a lion pic.twitter.com/rUyRWJM8GY— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 6, 2016
२००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘सरकार’ या चित्रपटाचा २००८ साली ‘सरकार राज’ नावाने सिक्वल प्रदर्शित करण्यात आला होता. हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरले होते. या चित्रपटाच्या दोन्ही भागात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. ‘सरकार’ चित्रपटाची मालिका राजकारण व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. याच मालिकेत राम गोपाल वर्मा ‘सरकार ३’हा चित्रपट तयार करीत आहे. यामध्ये अमिताभ बच्चनसह मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ, यामी गौतम व रोनित रॉय यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात अमिताभ एकदम नव्या भूमिकेत दिसणार आहेत. अमित साध याने यात महत्त्वाची भूमिका केली असून, तो अमिताभ यांचा नातू दाखविण्यात आला आहे. रोनित रॉय ‘गोकुल साटम’ या भूमिकेत तर मनोज वाजपेयीची भूमिका अरविंद केजरीवाल यांच्यावर आधारित आहे. जॅकी श्रॉफ चित्रपटाचे पहिले व्हिलन आहेत. जॅकीला या चित्रपटात सर्वजण सर म्हणून बोलविताना दिसणार आहे. रोहिणी हट्टंगडी यांनीही या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली आहे.}}}} ">Sarkar of acting preparing for a scene on the set of Sarkar 3 pic.twitter.com/98jsPlL1i0— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 6, 2016