Join us

राखी सावंतने स्वरा भास्करला म्हटले, ‘तेरे सटक गई है, दिमाग की अक्ल लटक गई हैं’, पहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 19:51 IST

स्वरा भास्कर हिने ‘पद्मावत’ या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली होती, आता ड्रामा क्वीन राखी सावंतने खास तिच्या अंदाजात स्वरावर टीका केली आहे.

‘पद्मावत’ या चित्रपटाबद्दलचा वाद शमला असे म्हटले तर ते जरा घाईचे ठरेल. कारण अजूनही चित्रपटावरून वादग्रस्त वक्तव्य समोर येणे सुरूच आहे. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. मात्र त्याला जो विरोध झाला तो इंडस्ट्रीमध्ये कधीही विसरला जाणार नाही. केवळ बाहेरूनच नव्हे तर इंडस्ट्रीमधून विरोधाचे काही सूर समोर आले. अभिनेता नाना पाटेकर याने चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर स्वरा भास्कर हिनेही काहीशी नाराजी व्यक्त केली. स्वराने चित्रपटात दाखविण्यात आलेल्या ‘जोहर’ या सीनबद्दल आक्षेप नोंदविला. त्यासाठी तिने दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांना एक ओपन लेटरही लिहिले. तिच्या या लेटरची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली होती. पुढे रणवीर, दीपिका आणि शाहिदने स्वराच्या या लेटरला जशास तसे उत्तर दिले. आता या वादात ड्रामा क्वीन राखी सावंत हिनेही उडी घेतली असून, तिच्याच अंदाजात तिने स्वरावर टीका केली आहे. राखी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये राखी स्वरावर हल्लाबोल करताना दिसत आहे. राखीने तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये राखी खूपच फनी दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे की, ‘स्वरा भास्कर तेरी सटक गई है, और तेरे दिमाग की अक्ल लटक गई है! ओके... ओपन लेटर... ओपन लेटर!’ सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बºयाच यूजर्सकडून तिच्या अशा वागण्याचा समाचारही घेतला जात आहे. परंतु राखीवर याचा कुठलाच परिणाम होणार नाही. कारण यापूर्वीदेखील यूजर्सनी तिला ट्रोल केले आहे. मात्र अशातही राखी आपले कारनामे करण्यास मागे हटत नाही.