Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतने जगजाहीर केली तिची ‘ही’ पर्सनल गोष्ट, व्हिडीओ झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 21:26 IST

चर्चेत राहण्यासाठी राखी सावंत काय करेल याचा काही नेम नाही. आता तिने अशी एक गोष्ट सांगितली ज्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चिली जात आहे. वाचा सविस्तर!

आयटम गर्ल राखी सावंत हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून, तिचा हा व्हिडीओ नेटिझन्सकडून प्रचंड प्रमाणात पसंत केला जात आहे. त्याचबरोबर सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही झपाट्याने व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल की, असे काय आहे त्या व्हिडीओमध्ये जे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात बघत आहेत? तर या व्हिडीओमध्ये राखी तिचा फेव्हरेट कंडोम फ्लेवर सांगताना दिसत आहे. त्यामुळेच आतापर्यंत हा व्हिडीओ हजारोंच्या संख्येने बघितला जात आहे. डान्सर ते अ‍ॅक्टर असा प्रवास करणाºया राखीला चर्चेत राहण्याचे चांगलेच फंडे माहिती आहेत. आता पुन्हा एकदा ती या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. वास्तविक हा व्हिडीओ शेअर करताना राखीने त्यास कॅप्शन दिली नाही. मात्र तिच्या हातात बीबॉय ब्रॅण्डच्या कंडोमचे पाउच दिसत आहे. राखी या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे की, पान फ्लेव्हर, ऊद फ्लेव्हर आणि चॉकलेट फ्लेव्हर माझे फेव्हरेट कंडोम फ्लेव्हर आहेत. राखीने पाच महिन्यांपूर्वी एका कंडोम ब्रॅण्डला प्रमोट करण्यासाठी एक प्रोजेक्ट साइन केला असून, त्यासाठी तिने इन्स्टाग्राम री-ज्वॉइन केले आहे. यावेळी राखीने असे म्हटले होते की, तिचे पहिले इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आल्याने ती नव्या अकाउंटच्या माध्यमातून इन्स्टाग्राम पुन्हा ज्वॉइन करीत आहे. असो, राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धूम उडवून देत आहे.  राखीने काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती की, ती लवकरच यूएसमधील दहा मोठ्या शहरांमध्ये डान्स अकॅडमी सुरू करणार आहे. राखीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास लवकरच ती रामरहीमच्या जीवनावर आधारित एका वादग्रस्त चित्रपटात त्याची कथित मुलगी हनीप्रीतची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. जेव्हा राखीने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती, तेव्हा तिने हनीप्रीत आणि रामरहीमबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्याचबरोबर राखी लवकरच एक आयटम नंबर करतानाही बघावयास मिळणार आहे.