राखी सावंतने जायरा वसीमला विचारले काही प्रश्न; म्हटले, ‘लगेचच आरडाओरड का केली नाही?’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:00 IST
विस्तारा फ्लाइटमध्ये आपल्यासोबत झालेल्या छेडछाड प्रकरणी इंटरनेटवर आवाज उठविणाºया अभिनेत्री जायरा वसीम हिचे बॉलिवूडमध्ये जोरदार समर्थन केले जात आहे. ...
राखी सावंतने जायरा वसीमला विचारले काही प्रश्न; म्हटले, ‘लगेचच आरडाओरड का केली नाही?’
विस्तारा फ्लाइटमध्ये आपल्यासोबत झालेल्या छेडछाड प्रकरणी इंटरनेटवर आवाज उठविणाºया अभिनेत्री जायरा वसीम हिचे बॉलिवूडमध्ये जोरदार समर्थन केले जात आहे. आता तिच्या समर्थनार्थ राखी सावंत हिनेही आवाज उठविला आहे. परंतु त्याचबरोबर तिने या प्रकरणी जायराला काही प्रश्नही विचारले आहेत, ज्याची उत्तरे अद्यापपर्यंत जायराने दिली नाहीत. राखीने जायराला विचारले की, ‘मला जाणून घ्यायचे आहे की, तिने सोशल मीडियावर तिच्याशी झालेला घटनाक्रम सांगण्याचे आणि मुंबईमध्ये फ्लाइट लॅण्ड होण्याची प्रतीक्षा का केली?राखीने म्हटले की, ‘तिच्यासोबत हा सर्व प्रकार घडत असताना तिने प्रतीक्षा न करता आरडाओरड करून गोंधळ का घातला नाही. त्या व्यक्तीने जायराला पाय लावण्यास सुरुवात करताच तिने त्याच्या जोरदार कानशिलात मारायला हवे होते. तसेच आरडाओरड करून आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रवाशांना आणि क्रू मेंबरला आपल्या बाजूने करायचे होते.’ पुढे राखीने म्हटले की, जर एक व्यक्ती चुकीची आहे, तर फ्लाइटमध्ये बसलेल्या अन्य व्यक्ती तर चांगल्या असतील? त्यामुळे तिने तेव्हाच निर्णय घ्यायला हवा होता. ती फ्लाइट लॅण्ड होण्याची प्रतीक्षा का करीत होती. शिवाय नंतर सोशल मीडियावर एखाद्या लहान मुलीप्रमाणे ती का रडत होती? राखीने म्हटले की, ‘दंगल’मध्ये आमीर खानने तिला शिकविले की, कसे लढायला हवे. जायरा दंगल गर्ल आहे, ती काही एखादी नाजूक मुलगी नाही. मला असे वाटते की, ती रडून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तिने तर त्या व्यक्तीची चांगली धुलाई करायला हवी होती. मी आतापर्यंत विस्तारा एअरलाइन्समधून बºयाचदा प्रवास केला. त्यांचा संपूर्ण क्रू खूपच विनम्र आहे. शिवाय त्यांचे पायलटही सक्षम आहेत. त्यामुळे मला प्रश्न पडला की, जायरासोबत असा प्रकार कसा काय घडू शकतो?