Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर 'या' तारखेला रिलीज होणार राजकुमार राव आणि कंगना राणौतचा 'मेंटल है क्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 11:45 IST

गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौतचा मेंटल है क्या चित्रपट काहींना काही कारणाला चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना राणौतसोबत राजकुमार रावसुद्धा आहे.

ठळक मुद्दे'मेंटल है क्या' 22 फेब्रुवारी 2019ला रिलीज होणार आहे'मेंटल है क्या' चित्रपटाच्या माध्यमातून कंगना दुसऱ्यांदा राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करणार आहे

गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौतचा मेंटल है क्या चित्रपट काहींना काही कारणाला चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना राणौतसोबतराजकुमार रावसुद्धा आहे. राजुमारने या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे मात्र त्यांने ती जरा हटके पद्धतीने केली आहे. 'मेंटल है क्या' 22 फेब्रुवारी 2019ला रिलीज होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट राजकुमारने एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली. 

  राजकुमार रावने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगनाने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केलेला आहे तर राजकुमार रावसुद्धा आपल्या हँडसम अंदाजात दिसतोय. दोघांची चालता-चालता एकमेकांशी टक्कर होते आणि मग दोघांचे भांडण होते. या व्हिडिओला एकता कपूरनेसुद्धा आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. 'मेंटल है क्या' चित्रपटाच्या माध्यमातून कंगना दुसऱ्यांदा राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. लवकरच कंगना 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट झांसीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे.सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत. आधी हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता मात्रा स्पेशल इफेक्ट्सचे काम अजून बाकी आहे. आता निर्माते  सप्टेंबरमध्ये चित्रपट रिलीज करण्याचा विचार करतायेत.  

 

टॅग्स :कंगना राणौतराजकुमार राव