Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरसोबत लग्न झाल्याचा या अभिनेत्रीने केला होता दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:59 IST

शाहिदच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. एका अभिनेत्रीने तर शाहिद हा तिचा पती असल्याचा दावा केला होता. ही अभिनेत्री दुसरी कोणीही नसून बॉलिवूडमधील एका सुपरस्टारची मुलगी आहे.

शाहिद कपूर आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शाहिदच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. शाहिदचे आजवर अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. करिना कपूर आणि त्याची प्रेमकथा तर चांगलीच गाजली होती. करिना आणि शाहिद लग्न करतील असेच सगळ्यांना वाटत होते. पण जब वी मेट या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही दिवस आधी त्यांनी त्यांच्या ब्रेकअप विषयी मीडियामध्ये सांगितले. पण तुम्हाला माहीत आहे का, एका अभिनेत्रीने शाहिद हा तिचा पती असल्याचा दावा केला होता. ही अभिनेत्री दुसरी कोणीही नसून बॉलिवूडमधील एका सुपरस्टारची मुलगी आहे. ती शाहिदच्या मागे पूर्णपणे वेडी झाली होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.राजकुमार यांनी त्यांच्या अभिनयाने अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य केले. त्यांच्यानंतर त्यांची मुले पुरू राजकुमार, वास्तविकता राजकुमार आणि पाणिनी राजकुमार यांनी चित्रपटसृष्टीत आपले भाग्य आजमावले होते. त्यांच्या तिन्ही मुलांना बॉलिवूडमध्ये यश मिळाले नाही. पण वास्तविकता ही त्यांची मुलगी एका वेगळ्याच कारणाने प्रकाशझोतात आली होती. तिने शाहिद कपूर तिचा नवरा असल्याचा दावा मीडियामध्ये केला होता. वास्तविकताने ऐसी भी क्या जल्दी है या चित्रपटापासून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. पण तिला काही यश मिळाले नाही. काही वर्षांपूर्वी वास्तविकता शाहिदच्या मागे लागली होती. शाहिद तिथे जायचा तिथे ती जायची. शाहिदच्या प्रेमात वेड्या झालेल्या वास्तविकताने त्याच्या घराशेजारीच घर घेतले होते. ती त्याच्या घराचे दार सतत ठोठावत असे. एवढेच नव्हे तर ती शाहिदच्या नातेवाईकांकडे देखील जायची. शाहिदने सुरुवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण वास्तविकता काही तिचा पिच्छा सोडत नव्हती. त्यामुळे शाहिदने पोलिस स्टेशनमध्ये तिच्याविरोधात तक्रार नोंदवली. वास्तविकताचे वडील राजकुमार हे प्रसिद्ध अभिनेत्री असले तरी वास्तविकाला बॉलिवूडमध्ये आपले करियर बनवता आले नाही. केवळ शाहिद कपूर प्रकरणामुळे ती प्रकाशझोतात आली होती. 

टॅग्स :शाहिद कपूरराज कुमार