Join us

24 वर्षानंतर रजनीकांतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' निर्मात्यासोबत थलायवाने केली हातमिळवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 15:45 IST

Rajinikanth: रजनीकांतच्या बॉलिवूड पदार्पणाची माहिती समोर आल्यापासून चाहते या सिनेमाविषयी जाणून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) याच्याविषयी काही फारसं सांगायला नको. या दिग्गज अभिनेत्याने त्याच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळेच साऊथ सिनेमांमध्येरजनीकांत यांना देवासमान मानलं जातं. आजवरच्या कारकिर्दीत रजनीकांत यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात साऊथसह बॉलिवूडपटांचाही समावेश आहे. मात्र, गेल्या २४ वर्षांमध्ये ते एकदाही बॉलिवूड सिनेमात झळकले नव्हते. त्यामुळे प्रेक्षक त्यांना हिंदी सिनेमांमध्ये पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

तब्बल २४ वर्षांपासून बॉलिवूडपटांपासून दूर असलेला रजनीकांत लवकरच एका नव्या कोऱ्या सिनेमासह बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. रजनीकांत बॉलिवूड निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या सिनेमात झळकणार आहे. सध्या या दोघांमध्ये आगामी सिनेमाची चर्चा सुरु असून ही माहिती खुद्ध साजिद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

"दिग्गज रजनीकांत यांच्यासोबत काम करणं अभिमानास्पद आहे. एका नव्या प्रवासाची सुरुवात आम्ही एकत्र करत आहोत, असं कॅप्शन देत साजिद यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. 

दरम्यान, यापूर्वी रजनीकांत  रोबोट या सिनेमात झळकला होता. हा सिनेमा २०१० मध्ये रिलीज झाला होता. रजनीकांत हा  दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जातं. रजनीकांत एका सिनेमासाठी १०० कोटींपेक्षा कमी मानधन घेत नाहीत. त्यामुळे आगामी बॉलिवूड सिनेमासाठी ते किती मानधन स्वीकारणार याकडेही सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :रजनीकांतबॉलिवूडसाजिद नाडियाडवालासिनेमासेलिब्रिटी