Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरच्या कुटुंबावर कोसळले संकट, पैसे संपत आल्याने वाढलीय चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 12:55 IST

कोरोना काळात त्यांच्याकडील सगळे पैसे संपले असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

ठळक मुद्देवंदना सजनानी या अभिनेत्री असून त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे पती राजेश देखील अभिनेते आहेत.

कोरोनाेमुळे अनेकांवर संकटं कोसळली आहेत. काहींनी आपली जवळची व्यक्ती गमावली आहे तर काहींना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सामान्य माणूसच नव्हे तर सेलिब्रेटींना देखील कोरोनामुळे पैशांची टंचाई भासत आहे. शाहिद कपूरचे सावत्र वडील राजेश खट्टर आणि त्यांची पत्नी वंदना सजनानी यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असल्याचे त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

वंदना सजनानी या अभिनेत्री असून त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे पती राजेश देखील अभिनेते आहेत. त्यांनी एका मुलाखतीत नुकतेच सांगितले की, त्यांच्याकडे साठवलेले सगळे पैसे आता संपत आले असून पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यांच्या घरात गेल्या वर्षभरात सतत कोणी ना कोणी आजारी असल्याने त्यांचा सगळा पैसा हा रुग्णालयांची बिले भरण्यातच गेला.

वंदना यांनी सांगितले की, गेल्या वर्षीपासून आमचा वाईट काळ सुरू आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सध्या आमच्याकडे काम नाहीये आणि रुग्णालयाची बिलं भरायला लागल्यामुळे आमच्याकडे जमवलेले सगळे पैसे संपले आहेत. गेल्या वर्षी मी रुग्णालयात होते. त्यानंतर माझे पती, सासरे यांना देखील रुग्णालयात दाखल करावे लागले होते. माझ्या सासऱ्यांना आम्ही वाचवू शकलो नाही. त्यांच्या जाण्याने आम्हाला मानसिक धक्का बसला आहे. आम्ही नेहमीच पैसे साठवण्याचा प्रयत्न केला. पण आता आमच्याकडे पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. 

शाहिद कपूरची आई निलिमा आझमी यांचे राजेश खट्टर यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना इशान हा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी घटस्फोट घेतला आणि राजेश यांनी वंदनासोबत लग्न केले.

टॅग्स :शाहिद कपूर