Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजेश खन्ना यांना करायचे होते या अभिनेत्रीसोबत लग्न, या कारणामुळे झाले ब्रेकअप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:37 IST

राजेश खन्ना आणि या अभिनेत्रीचे अफेअर ते दोघे इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच होते.

ठळक मुद्देअभिनेत्री अंजू महेंद्रा आणि राजेश खन्ना यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. ते दोघे इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच त्यांचे अफेअर होते. ते दोघे शाळेपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते.

राजेश खन्ना यांनी एकेकाळी त्यांच्या अभिनयाद्वारे लोकांच्या हृदयावर राज्य केले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. राजेश खन्ना यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार मानले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज राजेश खन्ना यांचा जन्मदिवस आहे. आज ते हयात असते तर ७८ वर्षांचे झाले असते. राजेश खन्ना यांच्या पर्सनल लाईफ इतकेच वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले.

अभिनेत्री अंजू महेंद्रा आणि राजेश खन्ना यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. ते दोघे इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच त्यांचे अफेअर होते. ते दोघे शाळेपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते. ते एकाच कॉलेजमध्ये शिकले होते. सात वर्षं त्यांचे अफेअर सुरू होते. राजेश खन्ना त्या काळचे सुपरस्टार असल्याने या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. दोघे लिव्ह इन मध्येसुद्धा राहत होते. आराधना या चित्रपटानंतर तर राजेश खन्ना यांची पॉप्युलॅरिटी दिवसेंदिवस वाढतच होती. राजेश खन्ना यांना मिळालेल्या या स्टारडममुळे त्यांचे पाय जमिनीवर राहिले नव्हते. 

आपल्याला मिळालेल्या यशाचा गर्व करू नये असे स्पष्ट मत अंजू यांचे असल्याने त्यांनी ही गोष्ट राजेश खन्ना यांना अनेकवेळा समजावली होती. पण त्यांना ही गोष्ट न पटल्याने त्यांनी अंजूसोबत नाते तोडण्याचे ठरवले. एवढचे नव्हे तर अंजू यांचे करिअर संपुष्टात यावे यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले होते. एका मुलाखती दरम्यान अंजू यांनी सांगितले होते की, त्या खूप मोकळ्या विचारायच्या होत्या. मात्र राजेश खन्ना ट्रेडिशनल विचाराचे होते. दोघांमध्ये नेहमीच मतभेद व्हायचे एवढेच नव्ह तर त्यांनी कपडे कोणते घालायचे यावरून देखील त्या दोघांचे मतभेद व्हायचे. अंजू यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी त्यांच्यापेक्षा कितीतरी वयाने लहान असलेल्या डिम्पल कपाडिया यांच्यासोबत लग्न केले. 

टॅग्स :राजेश खन्ना