Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची राजकन्या रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये जिजामातांच्या भूमिकेत, ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:00 IST

रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये जिजामातांची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिचं सांगली कनेक्शन!

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख गेल्या काही काळापासून आपला आगामी चित्रपट 'राजा शिवाजी'मुळे चांगला चर्चेत आहे. अलिकडेच चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे २०२६ म्हणजे महाराष्ट्र दिनाला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भुमिकेत आहेत. 'राजा शिवाजी'मध्ये स्वराज्यजननी 'राजमाता जिजाऊ' यांच्या भूमिकेत बॉलिवूडची लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे.  नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीनं या भूमिकेबद्दलचा आपला उत्साह व्यक्त केला.

तर ती अभिनेत्री आहे बॉलिवूडमधील सदाबहार 'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन. हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर, रितेश देशमुख यांच्या 'राजा शिवाजी' या भव्य ऐतिहासिक चित्रपटात ती 'राजमाता जिजाऊ' यांची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, सशक्त व्यक्तिरेखा आणि स्त्रीशक्तीचे सामर्थ्य दर्शन घडवणारी ही भूमिका असल्याने, आपण या भूमिकेसाठी क्षणाचाही विचार न करता त्वरित होकार दिला, असे भाग्यश्रीने सांगितले.

भाग्यश्री म्हणाली, "रितेशने जेव्हा मला ही कथा आणि जिजामातांच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले, तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. जिजामाता म्हणजे अशा स्त्रीची प्रतिमा आहे, जी स्वतः तर शक्तिशाली आहेच, पण इतरांनाही सशक्त करण्याची ताकद तिच्यात आहे. स्त्रीशक्ती म्हणजे केवळ तलवार उचलून लढणे नव्हे, तर एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला घडवणे, हे खरे सामर्थ्य असते". 'राजा शिवाजी' यातील भूमिकेसाठीही मी एकदिलानं काम करत असल्याचं तिने 'मुंटा'शी बोलताना नमूद केले.

सांगलीची राजकन्या आहे भाग्यश्री पटवर्धनभाग्यश्री पटवर्धन ही सांगलीच्या राजघराण्यातील राजकन्या आहे. तिचा जन्म मुंबईत माधवराव आणि राज्यलक्ष्मी यांच्या घरी झाला. जन्मतः भाग्यश्री पटवर्धन नावाने ओळखली जाणारी ही अभिनेत्री महाराष्ट्रातील प्रतिष्ठित राजघराण्याशी संबंधित आहे. भाग्यश्रीचे वडील विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांना आजही 'सांगलीचे राजा' म्हणून मान दिला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhagyashree to play Jijamata in Riteish Deshmukh's 'Raja Shivaji'

Web Summary : Bhagyashree Patwardhan will portray Rajmata Jijau in Riteish Deshmukh's 'Raja Shivaji,' releasing May 1, 2026, in multiple languages. She expressed enthusiasm for portraying the powerful historical figure, inspired by Jijamata's strength and leadership.
टॅग्स :भाग्यश्रीरितेश देशमुखछत्रपती शिवाजी महाराज