Join us

राजकारण्यांना काय सल्ला देशील? राहुल गांधींच्या प्रश्नावर किंग खानने दिलं 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 14:15 IST

हा जुना व्हिडिओ आहे जो सध्या व्हायरल होतोय. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक राजकारणी नेते बसलेले आहेत. तर स्टेजवर शाहरुख खान स्वत: आहे.

शाहरुख खान (Shahrukh Khan) बॉलिवूडचा किंग आहे. कोणीही गॉडफादर नसताना, अभिनयाचा फारसा नसताना त्याने टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर आज एवढं कमावलं आहे.  नुकतीच देशात लोकसभा निवडणूक पार पडली. NDA सरकारला जास्त मतं मिळाली. तर दुसरीकडे काँग्रेसनेही गेल्यावेळीपेक्षा चांगली कामगिरी करत आघाडी घेतली आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींनी काही वर्षांपूर्वी शाहरुख खानला प्रश्न विचारत राजकारण्यांसाठी सल्ला मागितला होता. यावर शाहरुखचं उत्तर आता व्हायरल होतंय.

हा जुना व्हिडिओ आहे जो सध्या व्हायरल होतोय. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक राजकारणी नेते बसलेले आहेत. तर स्टेजवर शाहरुख खान स्वत: आहे. राहुल गांधी शाहरुखला प्रश्न विचारतात की, 'तू राजकारण्यांना काय सल्ला देशील?' या प्रश्नावर आधी शाहरुख हसतो आणि म्हणतो, "मी उदरनिर्वाहासाठी खोटं बोलतो, धोका देतो कारण मी एक अभिनेता आहे. त्यामुळे मी फक्त एक शो आहे. पण सल्ला द्यायचा म्हणलं तर एकच सांगेन प्रामाणिकपणे काम करा. देशाचा अभिमान बाळगा. देशावर प्रेम करा आणि भ्रष्टाचार करु नका. गैर काही करु नका."

तो पुढे म्हणतो, "जर तुम्ही चांगलं काम केलंत तर आपण सगळेच पैसे कमावणार आहोत. सगळेच खूश राहणार आहोत. सर्वांनाच देशाचा अभिमान वाटणार आहे. त्यामुळे माझा सर्व राजकारण्यांना एकच सल्ला आहे की कृपया  शक्य तितकं प्रामाणिक राहा."

शाहरुखच्या या उत्तराचं कमेंटमध्ये सर्वांनीच कौतुक केलं आहे. स्क्रीप्ट नसताना इतकं चांगलं बोलणारा अभिनेता अस्तित्वात आहे अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

टॅग्स :शाहरुख खानराहुल गांधीराजकारणबॉलिवूडकाँग्रेस