Join us
Daily Top 2Weekly Top 5

लगान मधील या कलाकाराच्या पत्नीने दाखल केली घटस्फोटाची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 17:42 IST

या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ठळक मुद्देरघुबीरच्या लग्नाला 32 वर्षं झाली आहे. त्याच्या पत्नीने घटस्फोटाची याचिका दाखल केली असून त्याच्याकडे 10 कोटी रुपयाची पोटगी मागितली आहे.

रघुबीर यादवने लगान, असोका, डरना मना है, पीपली लाईव्ह, पिकू, न्यूटन, रोमिओ अकबर वॉल्टर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रघुबीरच्या अभिनयाची नेहमीच चर्चा केली जाते. पण आता रघुबीर त्याच्या व्यवसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या पत्नीने आता कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे.

रघुबीरच्या लग्नाला 32 वर्षं झाली आहे. त्याच्या पत्नीने घटस्फोटाची याचिका दाखल केली असून त्याच्याकडे 10 कोटी रुपयाची पोटगी मागितली आहे. त्यांना 30 वर्षांचा मुलगा असून मुलगा त्याच्या पत्नीसोबतच राहातो. 1988 मध्ये पोर्णिमा आणि रघुबीर यांचे लग्न झाले होते. त्यांनी लव्ह मॅरेज केले होते. त्या दोघांची ओळख नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये झाली होती. सहा महिन्यांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पोर्णिमा त्यावेळी प्रसिद्ध कथ्थक नर्तिका होती तर रघुबीर हा स्ट्रगलिंग अभिनेता होता. पोर्णिमाने रघुबीरसाठी तिचे करियर सोडले. पण रघुबीरला प्रसिद्धी मिळाल्यानंतर तो तिला आणि मुलाला विसरला असे तिचे म्हणणे आहे. 1995 मध्ये मुलाला आणि पोर्णिमाला रघुबीरने सोडून दिले. 

पोर्णिमाने म्हटले आहे की, रघुबीरचे अफेअर असल्याचा तिला 1995 मध्ये संशय आला होता. त्यावेळी तिने त्यांचे नाते वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण रघुबीरने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. पण त्यानेच काही महिन्यात तो परत देखील घेतला. 

रघुबीर आणि पोर्णिमा यांची भांडणं चव्हाट्यावर येण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील त्यांचे वाद मीडियात गाजले होते. रघुबीर गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री रोशनीसोबत नात्यात आहे. रोशनीने बनेगी अपनी बात या मालिकेत काम केले 

टॅग्स :बॉलिवूड