Join us

'किसी का भाई किसी की जान'साठी राघव जुयालने घेतली होती तगडी फी, आकडा वाचून येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 18:56 IST

'किसी का भाई किसी की जान' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला तरी या सिनेमासाठी राघवला तगडी रक्कम मिळाली होती.

राघव जुयाल हे देशातील प्रसिद्ध डान्सर पैकी एक आहे. डान्सव्यतिरिक्त राघवने ABCD 2 मध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नुकताच त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटात त्याने सलमान खानच्या भावाची भूमिका साकारली होती.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सध्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी राघवला किती फी देण्यात आली हे नुकतेच समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राघवने या चित्रपटासाठी एक कोटी 20 लाख रुपये घेतले आहेत. रिपोर्टनुसार, राघव तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि डिजिटल ऑडियन्सशी खूप जोडलेला आहे. सोशल मीडियावरही तो खूप लोकप्रिय आहे. त्यामुळेच त्याने या चित्रपटासाठी एवढी मोठी रक्कम घेतली आहे.

अलीकडेच त्याचं नाव को-स्टार शहनाज गिलसोबत जोडण्यात आलं होतं. मात्र, एका मुलाखतीदरम्यान त्याने या अफवांचं खंडन केलं होतं. या मुलाखतीत त्याने शहनाजचे कौतुक केले आणि म्हटले की, मला वाटते की ती पृथ्वीवरील सर्वात मजबूत व्यक्ती आहे. माझ्या मतं तिच्यासारखा सशक्त कोणी नाही. 

टॅग्स :सलमान खानशेहनाझ गिल