Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिकिनी फोटोवरून ट्रोल होणाºया राधिका आपटेचा आता पूल फोटो होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 21:20 IST

काही दिवसांपूर्वीच बिकिनी फोटोवरून ट्रोल झालेल्या राधिकाचा आता पूल साइड फोटो व्हायरल होत असून, त्यामध्ये ती नॅचरल ब्यूटी म्हणून दिसत आहे.

अभिनेत्री राधिका आपटे आपल्या भूमिकेत कुठलीच कसर सोडत नाही. त्यामुळेच राधिका आतापर्यंत हटके भूमिका साकारताना दिसली आहे. चित्रपटांबरोबर राधिका सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात राहणे पसंत करते. काही दिवसांपूर्वीच बिकिनी फोटोवरून ट्रोल झालेल्या राधिकाचा पुन्हा एकदा असाच काहीसा अंदाज बघावयास मिळाला आहे. यावेळेस तिने स्विमिंग पूलच्या बाजूला उभा असलेला तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने शेअर करताच केवळ एका दिवसाच्या आत त्यास दोन लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. राधिकाचे चाहते या फोटोवरून तिचे कौतुक करताना दिसत आहेत.  काही दिवसांपूर्वी राधिकाने शेअर केलेल्या एका बिकिनी फोटोवरून तिला ट्रोल करण्यात आले होते. परंतु या फोटोला मात्र यूजर्सकडून पसंत केले जात आहे. या फोटोमध्ये राधिका नॅचरल ब्यूटी लूकमध्ये दिसत आहे. त्यामुळेच राधिकाने हा फोटो शेअर करताच त्यास यूजर्सकडून सातत्याने कॉमेण्ट्स येत आहेत. कोणी ‘हॉट’ तर कोणी तिच्या नॅचरल सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे.  नुकतीच राधिका अभिनेत्री नेहा धूपियाच्या ‘बीएफएफ’ या चॅट शोमध्ये अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत पोहोचली होती. याठिकाणी तिने अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी राधिकाला विचारण्यात आले की, तुझ्या करिअरमधील सर्वात वियर्ड आॅडिशन कोणते आहे? याचे उत्तर देताना राधिकाने म्हटले होते की, ‘देव डी या चित्रपटाच्या आॅडिशनसाठी तिला फोनवर अश्लील बोलावे लागले.’ दरम्यान, राधिका नुकतीच अक्षयकुमारसोबत ‘पॅडमॅन’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.