Join us
Daily Top 2Weekly Top 5

​राधिकाची ‘ती’ लीक क्लिप असणार ‘या’ चित्रपटाचा भाग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 12:03 IST

अलीकडे येऊन गेलेल्या ‘पार्च्ड’ या चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांच्यातील चित्रीत झालेले इंटीमेट सीन्स लीक झाले ...

अलीकडे येऊन गेलेल्या ‘पार्च्ड’ या चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांच्यातील चित्रीत झालेले इंटीमेट सीन्स लीक झाले होते. त्यापूर्वी ‘मॅडली’या शॉर्टफिल्ममधील तिची अशीच एक क्लिपही लीक झाली होती. केवळ इतकेच नाही तर गतवर्षी शॉवर घेत असलेल्या राधिकाचा एक बोल्ड फोटोही व्हायरल झाला होता. यामुळे राधिका बरीच चर्चेत आली होती. पण राधिकाने मात्र अशा क्लिप लीक करणा-या आणि त्या धडाधड शेअर करणा-यांना चांगलीच चपराक लगावली होती. मला माझे शरिर दाखवण्यात कुठलीही लाज वाटत नाही. ज्यांना स्वत:चे शरिर बघायला लाज वाटते. ते दुस-याचे शरिर बघण्याचे शौकीन असतात. उद्या तुम्हाला कुणाची नेकेड बॉडी पाहण्याची इच्छा झाली तर माझी क्लिप पाहण्याऐवजी स्वत:ला नेकेड होऊन आरशात पाहा, असे सणसणीत उत्तर दिले दिले होते. पण आता राधिकाची रियल लाईफ कदाचित रिल लाईफ बनू पाहते आहे. होय, राधिकाच्या आगामी ‘बांबेरिया’ या इंडो- ब्रिटीश चित्रपटात राधिका एका लीक शॉवर क्लिप पीडितेची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात राधिका मेघना नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. मेघनाची शॉवर क्लिप लीक होते,असे यात दाखवण्यात आले आहे.फिल्ममेकर मायकेल ई वार्ड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. होय, आमच्या चित्रपटात असा एक सीन आहे. अनुराग कश्यपच्या ‘मॅडली’ या शॉर्टफिल्ममधील राधिकाची एक क्लिप लीक झाली होती. त्याचकाळात आम्ही हा सीन शूट केला होता. त्यावेळी खरोखरच आम्ही घाबरलो होतो. राधिकाची क्लिप लीक झाल्यानंतर हा सीन आमच्या चित्रपटात ठेवावा की नाही, या संभ्रमात आम्ही होतो. कारण राधिका त्यावेळी खरोखरच मनातून दुखावलेली होती. त्यामुळे नेमका तसाच सीन शूट करताना ती आणखी दुखावेल की काय, अशी आम्हाला भीती होती. पण राधिका एक ब्रेव्ह मुलगी आहे. तिने हा सीन करायला होकार दिला. आमच्या चित्रपटात राधिकाने मेघनाची भूमिका केली आहे. मेघनाचा फोन रस्त्यावरचा एक चोर घेऊन पळून जातो. या मोबाईलमध्ये राधिकाने शॉवर घेतानाचा एक व्हिडिओ शूट केलेला असतो. तो चोराच्या हाती पडला तर काय होईल, या भीतीने मेघना घाबरते,असे या चित्रपटाचे कथानक आहे. याचा अर्थ आम्ही राधिकाच्या रिअल लाईफ कॉन्टोव्हर्सी ‘कॅश’ असे मुळीच नाही. कारण हा सीन आधीच आमच्या स्क्रीप्टचा भाग होता, असे मायकेल म्हणाले.