Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:01 IST

'राज' सिनेमात तिने भूताची भूमिका साकारली होती.

बिपाशा बासू आणि डिनो मोरिया यांचा 'राज' सिनेमा आठवतोय? २००२ साली आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना चांगलंच हादरवून सोडलं होतं. बॉक्स ऑफिसवरही सिनेमा चांगला चालला होता. या हॉरर सिनेमाची आजही तितकीच क्रेज आहे. सिनेमात अभिनेत्री मालिनी शर्माने भूताची भूमिका केली होती. तिने या सिनेमातून पदार्पण केलं होतं आणि ती रातोरात स्टार झाली होती. सिनेमातील तिच्या इंटिमेट सीन्सचीही चर्चा झाली. यानंतर तिला अनेक भूमिका ऑफर झाल्या मात्र अचानक ती कुठे गायब झाली?

मालिनी शर्माने मॉडेलिंग विश्वात लोकप्रिय होती. 'सावन मे लग गयी आग','क्या सूरत है','रंझर' आणि कितनी अकेली' या म्युझिक अल्बममध्ये दिसली. 'राज' सिनेमाने तिला कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. त्याच काळात अभिनेता प्रियांशु चॅटर्जी देखील 'तुम बिन' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आला होता.  त्याच्या चार्मिंग व्यक्तिमत्वावर तरुणी भाळल्या होत्या. 'राज' सिनेमाच्या आधीच मॉडेलिंगमध्ये असतानाच मालिनी आणि प्रियांशूची ओळख झाली होती. त्यांच्याच प्रेमही फुललं. १९९७ सालीच दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र दोघांमध्ये काही कारणांनी बिनसलं आणि २००१ साली त्यांचा घटस्फोट झाला. याचा दोघांवरही परिणाम झाला. मालिनी इंडस्ट्रीपासून दूर निघून गेली.

'राज' हाच मालिनीचा शेवटचा प्रोजेक्ट होता. नंतर ती कुठे गायब झाली कोणालाच पत्ता लागला नाही. मालिनी सोशल मीडियावरही नसल्याने तिच्याबद्दल कोणालाच काही माहित नाही. तर कागी मीडिया रिपोर्टनुसार, मालिनीने काही वर्षांनी 'थोडा प्यार थोडा मॅजिक','जस्ट मॅरिड' या सिनेमांसाठी आर्ट डायरेक्टरचं काम केलं होतं.  

English
हिंदी सारांश
Web Title : 'Raaz' actress Malini Sharma: Where is she now?

Web Summary : Malini Sharma, famed for 'Raaz', vanished after its success. A former model, her marriage to Priyanshu Chatterjee ended in divorce. She reportedly worked as an art director later, disappearing from public view.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड