साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सतत चर्चेत येत असतो. त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा(Pushpa Movie)ला रिलीज होऊन बराच काळ उलटला आहे, तरीदेखील या चित्रपटाची चाहत्यांमधील क्रेझ अद्याप संपलेली नाही. त्याचे चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. अल्लू अर्जुन हा साउथ सिनेमातील अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांची कमाई खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्याच्या जाहिरातीतून मिळणाऱ्या कमाईबाबत मोठा खुलासा झाला आहे.
अल्लू अर्जुन फक्त जाहिरातीतून वर्षाला १०० कोटी रुपये कमावतो. साउथ सिनेमाच्या बातम्या देणाऱ्या KeepLovingCinema या इन्स्टाग्राम हँडलने हा दावा केला आहे. या इंस्टाग्राम हँडलनुसार, अल्लू अर्जुन केवळ जाहिरातीतून दरवर्षी १०० कोटी रुपये कमावतो. सध्या तो १० ब्रँड्सचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तो साउथ सिनेमातील सर्वोच्च ब्रँड व्हॅल्यू अभिनेत्यांपैकी एक आहे. याशिवाय अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटांमधून भरपूर कमाई करतो.
या वर्षी अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा द राइज' चित्रपटामुळे खूप चर्चेत होता. २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पा, पुष्पा द रुलच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुन या चित्रपटासाठी १२५ कोटी घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सुकुमार यासाठी ५० कोटी घेत आहे आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ५ कोटी घेत आहे. सध्या पुष्पा २ ची तयारी जोरात सुरू आहे.