Join us  

‘Pushpa 2’चा बजेट वाढला! अल्लू अर्जुनच्या मानधनाचा आकडा वाचून तर भोवळ येईल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 12:35 PM

Allu Arjun-starrer Pushpa: The Rule : होय, अल्लू अर्जुनच्या या सिनेमाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अशात चर्चा तर होणारच! सध्या चर्चा आहे ती ‘पुष्पा 2’च्या बजेटची आणि अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाची.

साऊथच्या चित्रपटांची बॉलिवूडला घाम फोडला आहे. हिंदीत डब सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. अलीकडे आधी ‘पुष्पा’ आला, मग ‘आरआरआर’नं धुमाकूळ घातला आणि पाठोपाठ ‘केजीएफ 2’ने बॉलिवूडची झोप उडवली. आता लोकांना प्रतीक्षा आहे ती ‘पुष्पा 2’ची (Pushpa 2). होय, अल्लू अर्जुनच्या या सिनेमाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अशात चर्चा तर होणारच! सध्या चर्चा आहे ती ‘पुष्पा 2’च्या बजेटची आणि अल्लू अर्जुनने (Allu Arjun) या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाची.

अल्लू अर्जुनने वसूल केली तगडी रक्कम‘पुष्पा-द राइज’नंतर ‘पुष्पा- द रूल’  (Pushpa: The Rule) या चित्रपटाची जबरदस्त हवा आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 1’ने विक्रमी कमाई करत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता ‘पुष्पा 2’ किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अल्लूच्या ‘पुष्पा 2’चं काम सुरू झालं आहे. मानधनाचं म्हणाल तर अल्लूने  मानधनाच्या बाबतीत बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकलं आहे.होय, ‘पुष्पा 2’साठी अल्लूने म्हणे 100 कोटी फी घेतली आहे. त्याने अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण हे खरं असेल तर ही त्याची आत्तापर्यंतची सर्वाधिक फी म्हणता येईल. ‘पुष्पा 1’साठी अल्लूने फक्त 35 कोटी फी घेतली होती. पहिला पार्ट सुपरडुपर हिट झाल्यानंतर भावही वाढणार. अल्लूचेही भाव वाढले आहेत, असंच म्हणायला हवं.

‘पुष्पा 2’चा बजेटही वाढला.‘पुष्पा 2’ हा सिनेमा पुढील वर्षी 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  चित्रपटाच्या पहिल्या भागाचं बजेट 200 कोटी रुपये इतकं होतं. पण आता दुसºया पार्टच्या बजेटमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. ‘पुष्पा 2’चं बजेट 400 कोटी असल्याचं कळतंय. यातील 100 कोटी नुसते अल्लूवर खर्च होणार आहेत. ‘पुष्पा 2’मध्ये सगळं काही बेस्ट असणार आहे आणि यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होणार आहे.  

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनTollywoodबॉलिवूड