Join us  

क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 4:40 PM

चित्रपटसृष्टीत लग्न सराईचा काळ सुरु झाला असून एकामागे एक सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकल्याचे पाहायला मिळत आहे.

 बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राटची आणि अभिनेत्री कृती खरबंदा यांनी काही दिवसांआधीच त्यांच्या नात्याची घोषणा केली. पुलकित आणि कृती हे रिलेशनमध्ये असल्याचं त्यांनी खुलेपणानं सांगून टाकलं. दोघांच्या नात्याची बातमी मिळताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. आता बॉलिवूडमधील हे लोकप्रिय कपल लवकरच बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

चित्रपटसृष्टीत लग्न सराईचा काळ सुरु झाला असून एकामागे एक सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. पुलकित सम्राट आणि अभिनेत्री कृती खरबंदा दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. पुलकित सम्राट आणि कृती खरबंदाच्या लग्नाला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये दोघांच्या लग्नाची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळतेय.

 बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, क्रिती आणि पुलकितच्या लग्नाची तारीख ठरली आहे. ही जोडी १३ मार्चला लग्न करणार आहे. लग्नाची तारिख ठरल्यानंतर आता दोघांच्या घरी जोरदार तयारी सुरू झाली आहे. या दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय ते डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं बोललं जातं आहे. 

पुलकित आणि क्रिती हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी 'पागलपंती' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. चित्रपटाचं प्रमोशन करत असताना त्या दोघांनी नात्याची कबूली दिली. दोघांनी 'वीरे दी वेडिंग' आणि 'तैश' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. नुकतेच  व्हॅलेंटाईन्स डेच्या निमिततानं दोघांनी फोटो शेअर करत एकमेकांवर असलेलं प्रेम जाहिर केलं. दोघेही अनेकदा  एकमेकांबरोबरचे फोटोही शेअर करताना दिसतात.

टॅग्स :कृति खरबंदासेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमालग्न