Join us

​राम गोपाल वर्मा करणार आंतराष्ट्रीय चित्रपटाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 16:08 IST

निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा लवकरच एका आंतराष्ट्रीय चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तब्बल ३४० कोटी रुपयांचे बजेट असणारा हा चित्रपट ...

निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा लवकरच एका आंतराष्ट्रीय चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तब्बल ३४० कोटी रुपयांचे बजेट असणारा हा चित्रपट वर्मा यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर पोस्ट करून आपल्या या आंतराष्ट्रीय प्रोजेक्टची माहिती दिलीय. त्यांनी ट्विटरवर लिहलेय, माझा सर्वांत मोठा इंटरनॅशनल प्रोजेक्ट ‘न्यूक्लीअर’ हा बिग बजेट चित्रपट आहे. याचे बजेट ३४० कोटींचे आहे. यासोबत त्यांनी या चित्रपटाचा फोटो देखील शेअर केला आहे. रामगोपाल वर्मा म्हणाले, आतापर्यंत फिक्शन व नॉन फिक्शन असे अनेक चित्रपट तयार झाले आहेत. मात्र ‘न्यूक्लीअर’  या विषयावर चित्रपट तयार करण्यात आला नाही. ‘न्यूक्लीअर’  सारख्या विषयावर आम्ही चित्रपट तयार करीत आहोत. हा भारतात तयार होणारा सर्वांत मोठा चित्रपट असेल. एवढ्या मोठ्या विषयावर तयार होणारा हा चित्रपट आम्ही सहजपणे प्रेक्षकांसाठी आणणार आहोत. हा चित्रपट दहशतवादावर आधारित असून ज्यामध्ये अणुबॉम्ब एका चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेल्यास काय होऊ शकते हे दाखविण्याचा आम्ही प्रयत्न क रणार आहोत. रामू म्हणाले, हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या झळा आजही पाहायला मिळतात, त्याची भयावहता आजही कायम आहे. हे आजच्या काळासाठी किती घातक आहे हे देखील आमच्या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या घटनेला ७० वर्षे झाली असून, अशी परिस्थिती आल्यास तिसरे महायुद्ध होईल असेही रामू यांनी सांगितले. रामूने शेअर केलेले पोस्टर भारतीय पार्श्वभूमीवर आधारित असल्याने या चित्रपटाला भारतीयांवर आधारित असल्याचे मानले जात आहे. राम गोपाल वर्मा हे सध्या त्यांच्या आगामी सरकार ३ या चित्रपटात व्यस्त असून, यात अमिताभ बच्चन, यामी गौतम, मनोज वाजपेयी, रोनित रॉय, रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. }}}} ">http://