Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका-निकच्या संगीत सोहळयाचे फोटो तुम्ही पाहिलेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 19:01 IST

संगीत सोहळयाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच या शाही सोहळयाचा साक्षीदार बनल्यासारखे वाटणार, यात काही शंका नाही.

 बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे ख्रिश्चियन पद्धतीने लग्न झाले आता सगळयांचे लक्ष तिच्या हिंदु पद्धतीने होणाऱ्या  विवाहाकडे लागून राहिले आहे. मात्र, त्यांच्या संगीत सोहळयाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच या शाही सोहळयाचा साक्षीदार बनल्यासारखे वाटणार, यात काही शंका नाही.

  

बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या गाण्यांवर इंडोवेस्टर्न स्टाईलमध्ये संगीत सोहळयाचे आयोजन केले होते. यावेळी विविध जुन्या-नव्या अशा धमाकेदार गाणी सादर झाली तसेच उपस्थित पाहुणेमंडळी आणि नातेवाईकांनी या सोहळयाचा साक्षीदार बनत यथेच्छ आनंद लुटला. त्यासोबतच लग्नापूर्वीच्या विविध विधी आणि कार्यक्रमांना सुरूवात झाली. या सोहळयावेळी प्रियांका आणि निक यांच्यासह सर्व उपस्थित पाहुणे, नातेवाईक , मित्रमंडळी सर्वजण अत्यंत आनंदात आणि हर्षाेल्हासात होते. 

 

या संगीतसोहळयादरम्यान हिंदी बॉलिवूड आणि इंग्रजी हॉलिवूड गाणी सादर झाली. विशेषत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीतील ७० आणि ८० च्या दशकांतील सुंदर गाण्यांवर यावेळी नृत्य सादर झाले. ‘ये शाम मस्तानी’,‘तुम मिले दिल खिले’, ‘मेरे लिए मेरे लिए’,‘दिल की कसम’ या गाण्यांनी सोहळयाची रंगत आणली. तसेच इंग्रजी गाणे टायटॅनिकचे थीम साँगही सादर झाले. या सोहळयाचे विशेष हे होते की, या गाण्यांसह डान्सही बघावयास मिळाला. गणेश हेगडे यांनी कोरिओग्राफी करत वेगवेगळया डान्सचे सादरीकरण केले. प्रियांका चोप्रा हिचे एक्स मॅनेजर  चांद मिश्रा हे देखील जोधपूर येथे पोहोचले.

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रा