जाणून घ्या, प्रियांका चोप्राचे ट्रॅव्हल सीक्रेट; ही वस्तू सोबत नसली की पीसी होते अस्वस्थ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 11:44 IST
priyanka chopra always carry a necklace wherever she goes :priyanka chopra: सध्या हॉलिवूड गाजवत असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची सर्वांत आवडती वस्तू कोणती तुम्हाला माहितीयं? नाही ना? प्रियांकाची सर्वांत आवडती वस्तू आहे, तिचा नेकलेस. होय. हा खास नेकलेस सोबत नसेल तर प्रियांका अस्वस्थ होते.
जाणून घ्या, प्रियांका चोप्राचे ट्रॅव्हल सीक्रेट; ही वस्तू सोबत नसली की पीसी होते अस्वस्थ!
सध्या हॉलिवूड गाजवत असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची सर्वांत आवडती वस्तू कोणती तुम्हाला माहितीयं? नाही ना? प्रियांकाची सर्वांत आवडती वस्तू आहे, तिचा नेकलेस. होय. हा खास नेकलेस सोबत नसेल तर प्रियांका अस्वस्थ होते. कामाच्या निमित्ताने पीसीला जगभर फिरावे लागते. यावेळी सगळ्या गरजेच्या वस्तू तिच्यासोबत असतात. मात्र हा नेकलेस प्रियांका कधीच विसरत नाही.हा नेकलेस प्रियांकाला तिचे स्वर्गीय वडील डॉ. अशोक चोप्रा यांची आठवण करून देतो. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने हे ट्रॅव्हलिंग सीक्रेट जाहिर केले. या विशेष प्रकारच्या नेकलेसमध्ये सोन्याच्या साखळीत रत्न, काही धार्मिक प्रतिक चिन्ह,एक रूद्राक्ष आणि लॉकेट रूपातला एक फोटो असे सगळे आहे. हा नेकलेस म्हणजे मी जीवापाड जपत असलेली वस्तू आहे. माझ्या डॅडींची आठवण म्हणून हा नेकलेस मी सतत स्वत:सोबत ठेवते, असे प्रियांकाने मुलाखतीदरम्यान सांगितले. या नेकलेसबद्दल ती सांगते, माझ्या आईने भारतातून एक सोन्याची जाडजूड साखळी विकत घेतली होती. सर्वात आधी यात केवळ एमराल्ड होतो. हिंदू मान्यतेनुसार, तो आरोग्य चांगले ठेवतो. मी अंधविश्वासू नाही. पण आपले कुणी आजारी पडते, तेव्हा त्याच्यासाठी प्रार्थना करताना आपसूक एखाद्या गोष्टीवर तुम्ही विश्वास करू लागता. त्यामुळे पुढील आठ वर्षांत या सोन्याच्या साखळीत माझ्या आईने काही दैवी चिन्हे मढवली. पण यामुळे ही साखळी वजनाने इतकी भारी झाली की, माझे वडील ती घालायला टाळाटाळ करत. डॅडी गेल्यानंतर ही साखळी मी घेतली. डॅडीच्या निधनानंतर त्यातील काही वस्तू मी काढून टाकल्या. पण त्यांची आठवण म्हणून ही साखळी मी नियमित घातले. ही साखळी गळ्यात असली की, जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी माझे कुटुंब माझ्यासोबत आहे, असे मला वाटते. .