Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉन-३’मधून प्रियांका चोप्राचा पत्ता कट; शाहरुख खानने शोधली नवी ‘जंगली बिल्ली’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 18:26 IST

निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर हा ‘डॉन-३’ मध्ये एका पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. परंतु ...

निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर हा ‘डॉन-३’ मध्ये एका पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. परंतु फरहानने या वृत्तांचे स्पष्टपणे खंडन केले आहे. ४४ वर्षीय फरहानने संकेत दिले होते की, तो डॉन सिरीजच्या तिसºया भागाच्या पटकथेवर काम करीत आहे. मात्र आता त्याने ट्विट करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, संपूर्ण माहिती जाणून न घेताच अशा प्रकारच्या बातम्या पसरविणे थांबवावे. खोट्या बातम्यांमुळे केवळ मनोरंजनाला बढावा मिळू शकतो. फरहान आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एंटरटेनमेंट कंपनीकडे ‘डॉन’चे सर्व अधिकार आहेत. दरम्यान, ‘डॉन’ या चित्रपटाची १९७८ मध्ये निर्मिती केली होती. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘डॉन’च्या पुढच्या भागात बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसले होते. गेल्यावर्षी सिधवानी यांनी म्हटले होते की, आमच्या टीमने ‘डॉन’ सिरीजच्या पुढच्या भागाच्या कथेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्यापपर्यंत हे स्पष्ट झाले नाही की, चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान करणार की आणखी दुसरे कोणी?त्याचबरोबर हीदेखील चर्चा आहे की, रोमाच्या भूमिकेत दिसलेल्या प्रियांका चोप्राचा या चित्रपटातून पत्ता कट करण्यात आला आहे. याअगोदर रोमाची भूमिका झीनत अमान आणि प्रियांकाने साकारली आहे. आता तिचा पत्ता कट झाल्यामुळे या भूमिकेत अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच चित्रपटाच्या सेटवर शाहरुख आणि प्रियांकामध्ये जवळीकता निर्माण झाली होती. त्यावेळी दोघांच्या अफेअरच्या सर्वत्र चर्चाही रंगल्या होत्या.